शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

GBS disease: गेल्या दहा वर्षांत पुणे स्मार्ट सिटी म्हणून किती विकसित झालं, हे तपासायला हवं;सुप्रिया सुळे संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 10:56 IST

सुप्रिया सुळे महापालिकेच्या भूमिकेवर केले प्रश्न उपस्थित

पुणे: खडकवासला आणि नांदेड परिसरात ‘जीबीएस’ (गिलन बॅरी सिंड्रोम) आजाराच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाण्यामुळे हा आजार वाढत असल्याचा संशय असून, प्रशासन यावर योग्य उपाययोजना करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.सुळे म्हणाल्या, "मी गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेसोबत पाठपुरावा करत आहे. पाणीपुरवठा सुरळीत आणि स्वच्छ असायला हवा. अनेक ठिकाणी एसटीपी प्लांट कार्यरत आहेत, तरीही प्रदूषण वाढतच आहे. सरकारने गांभीर्याने लक्ष घालावे. यासाठी गोखले इन्स्टिट्यूटकडून अभ्यास अहवाल तयार करून घ्यायला हवा."सरकार अपयशी, निधी गैरवापराचा आरोपसुळे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवरही टीका केली. "करोडो रुपये सरकार पाठवते, मात्र ते कुठे जातात? याचा हिशोब नाही. मोठा हिस्सा सल्लागार आणि ब्रोकरकडे जातो. गेल्या दहा वर्षांत पुणे स्मार्ट सिटी म्हणून किती विकसित झालं, हे तपासायला हवं. समस्या वाढत असताना प्रशासन कुठे कमी पडतंय?" असा सवाल त्यांनी केला.आरोग्य मंत्र्यांना फोन, सरकारवर टीकासुळे पुढे म्हणाल्या, "मी आजच आरोग्य मंत्र्यांना फोन करून डिटेल रिपोर्ट मागवणार आहे. सरकार आणि महापालिका अधिकारी वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. लोकांचे आरोग्य धोक्यात घालणारे सरकार जबाबदार नाही का? फक्त एकच हॉस्पिटल का, इतर ठिकाणीही उपचार उपलब्ध व्हायला हवेत."पाणीपट्टी वाढवू देणार नाही, आंदोलनाचा इशारामहापालिकेच्या नियोजनावर नाराजी व्यक्त करत सुळे म्हणाल्या, "सरकार नागरिकांच्या सेवेसाठी आहे की फक्त दादागिरी आणि खंडणीसाठी? आम्ही पाणीपट्टी वाढवू देणार नाही. याविरोधात तीव्र आंदोलन करू."दरम्यान, केंद्रीय पर्यावरण मंत्री लवकरच राज्य सरकारसोबत प्रदूषण आणि दूषित पाण्याच्या मुद्द्यावर चर्चा करणार असून, त्याच वेळी सुळे यांनीही यावर सविस्तर माहिती घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupriya Suleसुप्रिया सुळेHealthआरोग्यMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपात