शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

पुणे जिल्हयाचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:29 PM

जिल्ह्याची सूत्रे येणार हाती : मंत्रिपदांबाबतही उत्सुकता 

ठळक मुद्देसातवेळा निवडून आलेल्या वळसे-पाटील यांना प्रथमच पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा मान मिळणार

पुणे : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी- कॉँग्रेस आघाडीचे सरकार बनणार हे निश्चित झाल्यानंतर आता पुण्याचे पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे. मंत्रिमंडळात समावेश निश्चित असलेले दिलीप वळसे-पाटील यांचीच पालकमंत्रिपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. १९९० पासून तब्बल सात वेळा निवडून आलेल्या वळसे-पाटील यांना प्रथमच पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा मान मिळणार आहे. राष्ट्र वादी कॉँग्रेसची स्थापना झाल्यावर सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारमध्ये वळसे-पाटील मंत्री झाले. मात्र, त्या वेळी जिल्ह्याबाहेरील मंत्र्याला पालकमंत्री करण्याची परंपरा असल्याने विजयसिंह मोहिते-पाटील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यानंतर या संकेतामध्ये बदल झाला. अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपद आले. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात वळसे-पाटील यांनी नेहमीच अजित पवार यांच्या  धाकट्या भावाची भूमिका घेतली होती. पुणे जिल्हा परिषद असो की पुणे किंवा पिंपरी-चिंचवड महापालिका येथे अजित पवारच निर्णय घेत असत. त्याला वळसे-पाटील यांनी नेहमी साथ दिली. मात्र, या सगळ्या काळात शरद पवारांचा विश्वास त्यांनी प्रथमपासून कमाविला होता. त्यामुळे राज्यात राष्टÑवादी कॉँग्रेसने शिवसेना-कॉँग्रेससह सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू केल्यावर वळसे-पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेऊन उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर तर वळसे-पाटील यांचे महत्त्व आणखी वाढले. राष्टÑवादीच्या गटनेतापदीही त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. त्याचबरोबर अजित पवार यांची समजूत घालण्यासाठी झालेल्या बैठकांमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. तीनही पक्षांच्या आमदारांची व्यवस्था करण्याच्या जबाबदारीतही ते होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात त्यांचा समावेश निश्चित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांचीच पालकमंत्री म्हणून नियुक्ती होऊ शकते. राजकीय पातळीवर पुणे जिल्हा परिषद, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे. प्रशासकीय पातळीवरही पुणे शहर व जिल्ह्याच्या संदर्भातील विविध निर्णय त्यांना घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे वळसे-पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याची सूत्रे येणार आहेत. ........पुणे जिल्ह्यातील कोणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळअजित पवार यांच्या एका निर्णयाने...राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे सरकार आल्यावर अजित पवार यांचीच पालकमंत्रिपदी नियुक्ती होणार हे निश्चित होते. मात्र, शनिवारी त्यांनी वेगळा निर्णय घेतल्याने सगळीच समीकरणे बदलली. आता सगळ्या बैठकांमध्ये त्यांना पुन्हा आमदार म्हणून बसावे लागणार आहे...........तब्बल दहा वर्षांचा मंत्रिपदाचा आणि पाच वर्षे विधानसभा अध्यक्ष-पदाचा अनुभव असलेले आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांची मंत्रिपदी नियुक्ती निश्चित आहे. आघाडीच्या सरकारमध्ये आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही ‘संकटमोचक’ म्हणून त्यांची ओळख आहे. ..........शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे या देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत येऊ शकतात. पुणे शहरामध्ये शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी किमान एका मंत्रिपदाचा विचार होऊ शकतो.  डॉ. गोºहे सध्या उपसभापती असल्या तरी शिवसेनेच्या सरकारमध्ये त्यांच्या अनुभवाचा उपयोग होऊ शकतो. ........राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची जायंट किलर अशी ओळख आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा त्यांनी सलग दुसºयांदा पराभव केला. जागावाटपात पाटील यांच्यासाठी जागा सोडण्याची तयारीही त्यांनी दाखविली होती. परंतु, पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी कडवी लढत देऊन पराभव केला. बारामती लोकसभा मतदारसंघातील गणित सांभाळण्यासाठी मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो. ..........खेड- आळंदीतून निवडून आलेले दिलीप मोहिते हे देखील तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. २००४ आणि २००९ मध्ये त्यांनी विजय मिळविला होता. २०१४ मध्ये शिवसेनेचे सुरेश गोरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. नवी मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ..............शरूर-हवेलीमधून निवडून आलेले अ‍ॅड. अशोक पवार दुसºयांदा आमदार झालेले आहेत. २००९ मध्ये त्यांनी विजय मिळविला होता. मात्र, २०१४ मध्ये भाजपचे बाबूराव पाचर्णे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांनी या पराभवाचा वचपा काढला. सहकार क्षेत्रातील जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे. ,,,,,,,,,पुणे  शहरात यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसला दोन ठिकाणी यश मिळाले आहे. पुण्यासारख्या महत्त्वाच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसरमधून निवडून आलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यापैकी एका संधी मिळू शकते. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण