पालिका कर्मचाऱ्यांचा २५ लाखांचा समूह अपघात विमा; आतापर्यंत २१ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:24 IST2025-02-12T10:24:12+5:302025-02-12T10:24:24+5:30

१ ते ४ वर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांना २५ लाखांचा विमा असणार आहे. त्यासाठी अवघ्या ४४७ रुपयांची कपात केली जाणार

Group accident insurance of Rs 25 lakhs for municipal employees | पालिका कर्मचाऱ्यांचा २५ लाखांचा समूह अपघात विमा; आतापर्यंत २१ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना फायदा

पालिका कर्मचाऱ्यांचा २५ लाखांचा समूह अपघात विमा; आतापर्यंत २१ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना फायदा

पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना राबविली जाते. पूर्वी कर्मचाऱ्याकडून १३६ रुपये घेऊन १० लाख रुपयांचा विमा उतरवला जायचा. नंतर रक्कम वाढवली होती. यात दुजाभाव केला जात होता. त्यामुळे यामध्ये बदल केला आहे. आता १ ते ४ वर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांना २५ लाखांचा विमा असणार आहे. त्यासाठी अवघ्या ४४७ रुपयांची कपात केली जाणार आहे. या पॉलिसीची मुदत ३० जानेवारी २०२५ ते २९ जानेवारी २०२६ अशी असणार आहे.

महापालिकेच्या विविध विभागांत अनेक कर्मचारी काम करतात. जवळपास २० हजार कर्मचारी आहेत. शहराच्या सर्व विकासकामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. यामध्ये अ गटातील अधिकाऱ्यांसह ड गटातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेकडून विविध योजना दिल्या जातात. आतापर्यंत पालिकेकडून कामगारांना अपघात विमा दिला जात नव्हता; परंतु २०१६-१७ पासून महापालिकेच्या अधिकारी व कामगारांना विमा संरक्षण मिळत आहे. कारण जेव्हा एखादा कामगार अपघाताला बळी पडतो तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होते.

अनेकांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागतात, काहींना डोळे गमवावे लागतात. यामुळे हे लोक काम करण्यास सक्षम राहत नाहीत. अशा कामगारांना महापालिका विम्याच्या माध्यमातून आधार देत आहे. अशा प्रकारची योजना राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांना १० लाखांचा विमा मिळत होता. जे कायमचे अपंग असतील, त्यांना या योजनेचा १०० टक्के लाभ दिला जातो. कारण अपंगत्वाच्या प्रकारानुसार त्याचा लाभ कामगारांना मिळत आहे. महापालिकेत काम करणाऱ्या अ गटातील अधिकाऱ्यांपासून ते ड गटातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. यासाठी या कामगारांना त्यांच्या पगारातून दरमहा केवळ १३६ रुपये द्यावे लागत होते.

महापालिका प्रशासनाने २०१६-१७ या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. परिपत्रकानुसार ही विमा पॉलिसी वर्षभरात जगभरात कुठेही अपघात झाला तरी वापरता येणार आहे.

Web Title: Group accident insurance of Rs 25 lakhs for municipal employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.