शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘स्वारगेट- कात्रज’ मेट्रो प्रकल्पाला हिरवा कंदील; पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 20:29 IST

महामेट्रोकडून तयार करण्यात आला आराखडा

पुणे : दक्षिण पुण्यातल्या वाहतुक कोंडीवर उपाय ठरणाऱ्या ‘स्वारगेट ते कात्रज’ या भुयारी मेट्रो प्रकल्पाला पालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता देण्यात आली. महामेट्रोकडून या प्रकल्पाचा 3 हजार 600 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट या मागार्चे विस्तारीकरण कात्रजपर्यंत हा प्रकल्पामुळे होणार आहे.

महामेट्रोने केलेल्या या आराखड्यावर दोन वर्षांपासून एकमत होत नव्हते. हा मार्ग भुयारी असावा की उन्नत असावा याविषयी मतभेद होते. सर्वसाधारण सभेसमोर आठ महिन्यांपासून असलेल्या या प्रस्तावाला वेळेत मान्यता न मिळाल्याने राज्य व केंद्र शासनाच्या यंदाच्या अंदाजपत्रकात  तरतूद मिळू शकली नाही.

ऑनलाईन पद्धतीने बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या प्रकल्पाचा आराखडा मान्यतेसाठी ठेवण्यात आलेला होता. चर्चेदरम्यान शिवसेना व कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण करण्याची मागणी केली. शिवसेने गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी, वनाज ते रामवाडी मेट्रोचे काम सुरु असून कोथरुड भागात ही ते सुरु आहे. महामेट्रोकडून अनेकदा अलाईन्मेंट आणि अन्य बदल केले जातात. स्थानकांची जागा बदलली जाते. त्याचा नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे मेट्रो नेमकी कशी होणार याची माहिती दिली जावी. त्यानंतरच मान्यता द्यावी अशी भूमिका घेतली. तर, कॉंग्रेसच्या आबा बागूल यांनी, प्रकल्पाचे सादरीकरण व्हावे अशी मागणी केली.

नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी, पुणेकरांच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रकल्प आहे. गेली दोन वर्षे याप्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही. महापौर, आयुक्त यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण झाले आहे. सर्व गटनेत्यांसमोर सादरीकरण केले जाईल. हा प्रस्ताव आजच मंजूर करण्याची मागणी केली.

दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला पुढील आठवड्यात प्रकल्पाचे सादरीकरण करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर एकमताने प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. ====स्वारगेट ते कात्रज मेट्रो विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव आज सर्वसाधारण सभेत मान्य करण्यात आला. गेले दोन वषार्पासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. मेट्रो विस्तारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प  (डीपीआर) महामेट्रो ने तयार केलेला आहे. पालिकेने हा डीपीआर मान्य करून राज्य तसेच केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी न पाठविल्याने केंद्र आणि राज्य सरकारने त्यांच्या अंदाजपत्रकात आवश्यक तो निधी मिळाला नाही. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने कत्रजपर्यंत मेट्रो होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.- गणेश बिडकर, सभागृह नेता

====

स्वारगेट - कात्रज मेट्रो प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता देण्याचा विषय अनेक महिने प्रलंबित होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यसभा होत नसल्यामुळे या प्रकल्पाला मान्यता मिळण्यास उशिर झाला. यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकामध्ये निधी मिळाला नाही.  महापालिकेच्या मुख्यसभेने आराखड्याला मान्यता दिल्यामुळे आता याप्रकल्पाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पाला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्काळ हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल.

- महापौर मुरलीधर मोहोळ

.......

स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्गाची रुंदी 5.46 किलोमिटरस्थानके  : तीनखर्च : 3 हजार 600 कोटीहिस्सा : केंद्र सरकार 50 टक्के, राज्यसरकार 30 टक्के, महापालिका 20 टक्के 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMetroमेट्रोkatrajकात्रजSwargateस्वारगेट