श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ४५१ मिष्टान्नांचा महानैवेद्य; लाडक्या बाप्पासमोर भव्य अन्नकोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 19:03 IST2023-11-26T19:02:32+5:302023-11-26T19:03:37+5:30
मिठाई, फराळाच्या तिखट-गोड अशा वेगवेगळ्या पदार्थांचा तसेच विविध प्रकारच्या फळांचा व भाज्यांचा महानैवेद्य

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ४५१ मिष्टान्नांचा महानैवेद्य; लाडक्या बाप्पासमोर भव्य अन्नकोट
पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रींना तब्बल ४५१ प्रकारचे मिष्टान्न अर्पण करण्यात आले होते. लाडक्या बाप्पासमोर मांडलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा भव्य अन्नकोट पाहण्याकरिता पुणेकरांनी सकाळपासूनच मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली. मिठाई, फराळाच्या तिखट-गोड अशा वेगवेगळ्या पदार्थांचा तसेच विविध प्रकारच्या फळांचा व भाज्यांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर दाखविण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरिता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते.