भारीच! हवेली परिसरात "बघतोय रिक्षावाला फोरम"च्या देवदूतांची माणुसकी; ऑक्सिजन रुग्णांसाठी रिक्षासेवा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 14:57 IST2021-05-10T14:14:47+5:302021-05-10T14:57:02+5:30

पूर्व हवेलीत कोरोना रुग्णांना बेड,ऑक्सिजन बेड उपलब्ध होताना अडचण येत आहेत.

Great! The humanity of the angels of "Baghtoy Rikshawala Forum" in the haveli area; Rickshaw service for oxygen patients | भारीच! हवेली परिसरात "बघतोय रिक्षावाला फोरम"च्या देवदूतांची माणुसकी; ऑक्सिजन रुग्णांसाठी रिक्षासेवा 

भारीच! हवेली परिसरात "बघतोय रिक्षावाला फोरम"च्या देवदूतांची माणुसकी; ऑक्सिजन रुग्णांसाठी रिक्षासेवा 

पुणे (कदमवाकवस्ती): गेल्या एक वर्षाहून जास्त काळ भारतात आणि जगभरात कोरोना ठाण मांडून बसला आहे. या काळात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या जशा घटना घडल्या, तशाच माणुसकीवरचा विश्वास अजून बळकट करणारे देवदूतही! याचेच एक उदाहरण म्हणजे पूर्व हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन या परिसरात बघतोय रिक्षावाला फोरमच्या रिक्षा ऑक्सिजनची सुविधा देणाऱ्या रुग्णवाहिकेची भूमिका पार पाडत आहे.

पूर्व हवेलीत कोरोना रुग्णांना बेड,ऑक्सिजन बेड उपलब्ध होताना अडचण येत आहेत. आणि यावेळी रुग्णांना बेड शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. हे करताना रुग्णाची ऑक्सिजनची पातळी खालावली तर त्यामध्ये त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे, म्हणून बघतोय रिक्षावाला फोरमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केशव क्षिरसागर व उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन या परिसरात बघतोय रिक्षावाला फोरमचे एक जुगाड रुग्णवाहिका हा उपक्रम राबवला जात आहे.

ऑक्सिजन सिलेंडर लावुन रिक्षा रुग्णवाहिका ही सेवा देणे सुरू केले आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होऊ नयेत या विचारातून हे काम सुरू केले आहे. या फोरमचा ९६५७२८९४११ हा एक हेल्पलाईन नंबर असून गरजू रुग्णांना या हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यावर २० ते २५ मिनिटांत सेवा उपलब्ध होईल अशी माहिती संतोष नेवासकर यांनी दिली. सध्या तीन रिक्षा सुरू असून अजून दहा रिक्षा पूर्व हवेलीत धावणार असल्याची माहिती यावेळी दिली.

 

या रिक्षा चालवण्यासाठी परिसरातील मायकल शिरसाठ, सचिन वैराट, सोमनाथ म्हस्के, संतोष नेवासकर, आशिष ओपळकर, आलताफ शेख, आप्पा हिरेमठ,दीपक अहिरे,प्रकाश घाडगे,मेमन युसूफ,शाहबाज पटेल,अमोल चौगुले,मंगेश अडागळे हे धाडसी चालक कुठल्याही पैशाची आशा न बाळगता गोरगरीब गरजु रुग्णांना मोफत रुग्णवाहिका सेवा देत आहेत.
  

Web Title: Great! The humanity of the angels of "Baghtoy Rikshawala Forum" in the haveli area; Rickshaw service for oxygen patients