शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

पूर्व हवेलीत भाजपने आपला एकमेव गडही गमावला; सोरतापवाडीत स्थापनेनंतर प्रथमच सत्तांतर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 6:33 PM

सत्ताधारी भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी व युवा नेते सागर चौधरी यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात विरोधकांना यश आले आहे.

ठळक मुद्देसोरतापेश्वर ग्रामविकास पुरस्कृत पॅनेलला ८ जागा

उरुळी कांचन :  सोरतापवाडी (ता. हवेली ) येथील ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामपंचायत स्थापनेच्या तब्बल सहा दशका नंतर ग्रामपंचायतीवर सत्तांतर घडले आहे. पूर्व हवेलीतील भाजपच्या हातात असलेली एकमेव ग्रामपंचायत या निवडणुकीत हातातून निसटली.

 ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी व युवा नेते सागर चौधरी यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात विरोधकांना यश आले आहे. विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व शिवशंभो विकास आघाडीला ८ जागांवर विजय मिळवता आल्याने सत्तेवर कब्जा मिळविता आला आहे. सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या १५ जागांपैकी ११ जागांसाठी आज मतमोजणी पार पडली.११ जागांसाठी सत्ताधारी सुदर्शन चौधरी व सागर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाई के.डी. चौधरी पुरोगामी ग्रामविकास पॅनेल तर विरोधात राष्ट्रवादी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी ,माजी उपसरपंच राजेंद्र तानाजी चौधरी व राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते अजिंक्य रामदास चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व शिवशंभो ग्रामविकास आघाडी यांच्यात झालेल्या लढतीत सोरतापेश्वर पॅनेलने ११ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत. तर यापूर्वी या पॅनेलची वार्ड क्र एक मधून १ जागा बिनविरोध निवडून आल्याने सोरतापेश्वर पुरस्कृत पॅनेलला ८ जागा मिळवून ग्रामपंचायतीवर बहुमत प्राप्त झाले आहे. निवडणूकीत प्रत्यक्ष लढविलेल्या ११ जागांपैकी भाई के.डी. चौधरी पुरोगामी पॅनेलला केवळ ४ जागा राखता आल्या आहेत.

सत्तेला खिंडार पाडण्यात यशस्वी ठरणाऱ्या सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व पॅनेल  पुरस्कृत शिवशंभो ग्रामविकास आघाडीचे प्रचाराची यंत्रणा राष्ट्रवादीचे स्थानिक गाव पुढारी रामदास चौधरी, बाळासाहेब चोरघे व सोनबा चौधरी यांनी संभाळत  विजय खेचून आणण्यात  महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. निवडणूकीत विजयी झालेले पॅनेल निहायउमेदवार पुढीलप्रमाणे :-  प्रभाग क्र. १) शंकर ज्ञानोबा कड , सुप्रिया देवेंद्र चौधरी, रविंद्र मोहन गायकवाड (सोरतापेश्वर पॅनेल ) ,प्रभाग क्र. २) विलास शंकर चौधरी , स्नेहल विठ्ठल चौधरी , सुनिता कारभारी चौधरी(भाई के.डी. चौधरी पुरोगामी ग्रामविकास पॅनेल ), प्रभाग ३) निलेश विठ्ठल खटाटे ,पुनम नवनाथ चौधरी (शिवशंभो आघाडी ) , अश्विनी चंद्रकांत शेलार ( पुरोगामी पॅनेल ) ,प्रभाग क्र. ४) विजय सर्जेराव चौधरी , मनिषा नवनाथ चौधरी ,सोनाली नागनाथ लोंढे (पुरोगामी पॅनेल )प्रभाग ५) सुरज उर्फ सनी पोपट चौधरी , संध्या अमित चौधरी व शशिकांत दशरथ भालेराव (सोरतापेश्वर पॅनेल).

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक