शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जीपीएस सिस्टीममुळे इलेक्ट्रिक बाईक चोरटे जाळ्यात; भाड्यानं घेऊन परस्पर करत होते विक्री, ३ तरुण गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 15:44 IST

जीपीएसद्वारे बाईकचा माग काढून चोरट्यांना ताब्यात घेऊन बाईक जप्त केल्या

ठळक मुद्दे इलेक्ट्रिक बाईक नाना पेठेतील पिंपरी चौक येथे प्रत्येकी ८ हजार रुपये किंमतीत परस्पर केल्या विक्री

पुणे : आठवड्याभरासाठी इलेक्टिक बाईक भाड्याने घेऊन त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या तीन तरुणांना समर्थ पोलिसांनीअटक केली आहे. इलेक्ट्रिक बाईक भाड्याने घेतल्यानंतर तिला जीपीएस सिस्टीम बसवल्याचे त्यांना माहितच नव्हते. त्यामुळे ते बिनधास्त या बाईकचा व्यवहार करत होते. समर्थ पोलिसांनी या जीपीएसद्वारे बाईकचा माग काढून चोरट्यांना ताब्यात घेऊन बाईक जप्त केल्या आहेत.

अरीश रेमंड धवर (वय ३१, रा. लक्ष्मी रेसिडेंसी, पठारे वस्ती, लोहगाव), अंबरेश शांतनूर बिदनूर (वय ३३, रा. पठारे वस्ती, लोहगाव) आणि नरेंद्र विजय पुरुड (वय ३७, रा. नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. नरेंद्र पुरुड याचं नाना पेठेत नरेंद्र मोटर्स या नावानं दुचाकी खरेदी विक्रीचं दुकान चालवतो.

धानोरी येथील श्राईड इंडिया प्रा. लि. या दुकानातून तिघांनी १६ ऑगस्टला भाड्याने ३ इलेक्ट्रिक बाईक घेतल्या होत्या. दुकान मालकाने ८ दिवसांसाठी नाना पेठ येथे त्या भाड्याने दिल्या होत्या. भाड्याची मुदत संपल्यानंतर या बाईक परत करणे आवश्यक असताना त्या त्यांनी परत केल्या नाही. त्यामुळं दुकान मालकानं संबंधित व्यक्तिकडे फोनवर संपर्क केला. तेव्हा त्यानं बाईक आज देतो, उद्या देतो, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर फोन बंद केल्यानं  फिर्यादीला त्यांची फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यांनी २९ ऑगस्ट रोजी समर्थ पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दिली.

या गुन्ह्याचा तपास करत असताना या इलेक्ट्रिक बाईक नाना पेठेतील पिंपरी चौक येथे प्रत्येकी ८ हजार रुपये किंमतीत परस्पर विक्री केल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच या तिन्ही बाईकला जीपीएस सिस्टिम असल्याची या आरोपींना माहिती नव्हती. त्यामुळे ते अगदी बिनधास्तपणे बाईकचा व्यवहार करीत होते. वाहनाची खरेदी विक्री करताना शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करुनच व्यापारी व नागरिकांनी व्यवहार करावेत अन्यथा आपली अशाच प्रकारे फसवणूक होऊ शकते, तसेच कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते, असे आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीbikeबाईक