शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

उच्च शिक्षणाच्या सरकारीकरणाचा हेतू नाही; प्रकाश जावडेकर यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:22 AM

व्याने उच्च शिक्षण आयोग स्थापन करताना त्याचे सरकारीकरण करण्याचा केंद्र शासनाचा कुठलाही हेतू नाही, असे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

पुणे : केंद्रीय अनुदान आयोगाच्या (यूजीसी) जागी नव्याने उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्याबाबतच्या मसुद्यावर सूचना मागविण्यात आल्या होत्या. यावर आतापर्यंत २० हजार सूचना प्राप्त झाल्या आहेत. सोमवारी या विषयावर संसदेत चर्चा होणार आहे. हा आयोग स्थापन करताना त्याचे सरकारीकरण करण्याचा केंद्र शासनाचा कुठलाही हेतू नाही, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी स्पष्ट केले.स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्या वतीने प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत कोथरूड परिसरातील १६३ महिलांना एलपीजी गॅसचे विनामूल्य वाटप करण्यात आले. जावडेकर यांनी या वेळी पत्रकारांशी संवाद साधला.जावडेकर यांनी सांगितले, विरोधकांची दुरवस्था झाली आहे. देशात मोदीद्वेषाचे राजकारण सुरू आहे. द्वेषावर राजकारण चालत नाही. अविश्वास ठराव फेटाळला गेल्याने सरकारने जनतेचा विश्वास, मन आणि हृदय जिंकले आहे.विद्यार्थ्यांनी काय अभ्यास करावा याची पालकांना माहिती व्हावी यासाठी पहिले ते आठवीच्या पालकांना माहितीपत्रके देणार आहोत. पाचवी व आठवीत दोन वेळा परीक्षा घेण्याचा किंवा न घेण्याचा अधिकार राज्य शासनाला देण्यात आला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवायचे की नाही याचा निर्णय आता राज्य शासनाकडून घेतला जाईल.मध्यान्ह भोजनाचे स्वरूप काय असावे, याचे प्रयोग राज्य सरकारने करावेत. प्रत्येक विद्यार्थ्याला दरडोई ९ रुपये अनुदान दिले जाते. या योजनेसाठी शासनाने १७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दहा कोटी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.विद्यापीठातील भरतीच्या निर्णयासाठी थोडे दिवस थांबावे लागेल, आरक्षण कायम राहील. संस्थेचे एकत्र रोस्टर असेल विभागवार नसेल. सर्वांच्या अधिकारांचे संरक्षण होईल, असे जावडेकर यांनी सांगितले.भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, सुशील मेंगडे, दीपक पोटे, माधुरी सहस्रबुद्धे, श्रद्धा प्रभुणे, मंजूश्री खर्डेकर, वासंती जाधव, छाया मारणे, अल्पना वरपे, किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील, प्रकाश बालवडकर उपस्थित होते. स्मार्ट पुणे फाऊंडेशनचे डॉ. संदीप बुटाला यांनी संयोजन केले.दहा कोटी महिलांना गॅस कनेक्शनप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते कोथरूड परिसरातील १६३ महिलांना एलपीजी गॅसचे विनामूल्य वाटप करण्यात आले. देशभरात या योजनेअंतर्गत आतापर्यंत १० कोटी महिलांना विनामूल्य गॅस कनेक्शन देण्यात आल्याची माहिती जावडेकर यांनी या वेळी दिली.महिलांना स्वयंपाकासाठी चुलीचा वापर करावा लागतो. त्यासाठी झाडे तोडावी लागतात, पर्यावरणाचा ºहास होतो, धुरामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. देशातील या गरीब महिलांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी मोदींनी उज्ज्वला योजना सुरू केली.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरEducationशिक्षण