शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

टेकड्यांचे होणार भूशास्त्रीय सर्वेक्षण

By admin | Updated: March 10, 2015 04:58 IST

माळीण’ दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात लोकवस्ती निर्माण झालेल्या टेकड्यांचे भूशास्त्रीय (जिआॅलॉजिकल) सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

सुनील राऊत, पुणे‘माळीण’ दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात लोकवस्ती निर्माण झालेल्या टेकड्यांचे भूशास्त्रीय (जिआॅलॉजिकल) सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पालिकेच्या २०१४-१६ च्या अंदाजपत्रकात तब्बल २ कोटी १२ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. शहरातील ४२ टक्के झोपडपट्ट्यांमधील जवळपास २० टक्के झोपडपट्ट्या टेकड्याच्या परिसरात असल्याने भविष्यात माळीणसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहराच्या चारही बाजूंपैकी पूर्व, दक्षिण आणि पश्चिम भागात अधिक टेकड्या आहेत. या टेकड्यांवर बीडीपीचे (बायो डायव्हर्सिटी पार्क) आरक्षण आहे. मात्र, त्यानंतरही या टेकड्या फोडून अनेक अनधिकृत बांधकामे झाले आहेत. तर, अनेक टेकड्यांवर झोपडपट्ट्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यात प्रामुख्याने वारजे परिसर, पर्वती, गोखलेनगरचा काही भाग, रामटेकडी, रामनगर, हनुमान टेकडी, केळेवाडी, येरवड्याचा काही भाग, बिबवेवाडी, कात्रज, तळजाई, तुकाईनगर, वडगावचा काही भाग, तसेच आंबेगाव आणि जांभूळवाडीचा काही भाग या प्रमुख टेकड्यांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठी लोकवस्ती झाली आहे. त्यामुळे या ठिकाणीही पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता आहे. जुलै २०१४ मध्ये माळीण येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत संपूर्ण गावच दरडीखाली गाडले गेले होते. त्यात १३६ जणांचा मृत्यू झाला होता. मोठा पाऊस अथवा भूकंप झाल्यास पुण्यातील टेकड्यांच्या परिसरातही अशी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातही या धोक्याबाबत शक्यता व्यक्त करण्यात आल्याने भविष्यातील खबरदारीचा उपाय म्हणून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.