शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘आया मेरा भाई आया’ म्हणत गुंड कसबेची येरवड्यात रॅली; 'माय किंग बॅक' रिल्स व्हायरल

By नितीश गोवंडे | Updated: January 9, 2025 23:30 IST

तो बाहेर येताच त्याने व त्याच्या समर्थकांनी काढलेली रॅली सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र

पुणे - येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड आणि दहशत माजवल्याप्रकरणी प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे टोळीवर मोक्काची कारवाई केली होती. गुड्या कसबे मंगळवारी (दि. ७) सायंकाळी येरवडा कारागृहातून बाहेर आला. तो बाहेर येताच त्याने व त्याच्या समर्थकांनी काढलेली रॅली सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र त्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेली रॅली दहशत पसरवणारी असल्याने त्याला आणि त्याच्या समर्थकांना चांगलीच महागात पडली आहे. याप्रकरणी आता येरवडा पोलिस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील आणि तुषार पेठे यांच्यासह ३५ ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई लहू गडमवाड यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रफुल्ल कसबे हा मंगळवारी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास त्याच्या समर्थकांनी त्यांच्याकडील चारचाकी गाड्या व २० ते ३० दुचाकींवरून रॅली काढली. ही रॅली विनापरवानगी काढून यावेळी गाड्या बेदरकारपणाने चालवत आरडा-ओरडा व घोषणाबाजी करून परिसरात दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर कसबे याच्यासह सुमारे ५० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजन चौक परिसरात हा गुंड प्रफुल्ल कसबे हा जामिनावर बाहेर आल्यानंतर जल्लोष करण्यात आला होता.

समर्थनार्थ काढलेली रॅली उलटली चार वर्षापूर्वी तळोजा कारागृहातून बाहेर पडलेल्या गुंड गजा मारणे याच्या रॅलीनंतर शहरातील गुन्हेगारी ढवळून निघाली होती. त्यानंतरच शहरात टोळ्यांवर मोक्काचे सत्र सुरू झाले होते. त्यानंतर सुमारे २४० टोळ्यांवर मागील चार वर्षांत मोक्का अंतर्गत कारवाई झाली. त्यापैकी एका मोक्काच्या कारवाईत कारागृहात असलेला प्रफुल्ल कसबे जामिनावर सुटला. मात्र त्याच्या समर्थनार्थ काढलेली रॅली ही त्याच्यावर उलटली आहे. पोलिसांनी याप्रकरणात त्याला करण्याची तजवीज देखील ठेवली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसyerwada policeयेरवडा पोलीसyerwada jailयेरवडा जेलCourtन्यायालयArrestअटक