कंटेनरमधून ॲमेझॉन कंपनीच्या ४८ लाख रुपयांच्या वस्तू लंपास; चालकाविरोधात गुन्हा

By प्रकाश गायकर | Published: March 20, 2024 06:12 PM2024-03-20T18:12:56+5:302024-03-20T18:13:12+5:30

हा सारा प्रकार १२ ते १४ मार्च या कालावधीत बेंगलोर ते आंबेठाण, पुणे या मार्गावर घडला...

Goods of Amazon company worth Rs 48 lakh stolen from the container | कंटेनरमधून ॲमेझॉन कंपनीच्या ४८ लाख रुपयांच्या वस्तू लंपास; चालकाविरोधात गुन्हा

कंटेनरमधून ॲमेझॉन कंपनीच्या ४८ लाख रुपयांच्या वस्तू लंपास; चालकाविरोधात गुन्हा

पिंपरी : ॲमेझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाईल व इतर महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची वाहतूक करत असताना त्यामधील ४८ लाख रुपयांच्या महागड्या वस्तू लंपास केल्या. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा सारा प्रकार १२ ते १४ मार्च या कालावधीत बेंगलोर ते आंबेठाण, पुणे या मार्गावर घडला. याप्रकरणी अनुज सचिव तिवारी (वय २५ रा. वाघोली) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून शाहिद इलियास (२५, रा. राजस्थाान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सेंच्युरी कार्गो कॅरियर ट्रान्सपोर्ट फर्ममध्ये संशयित आरोपी हा कंटेनर चालक म्हणून काम करत होता. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्याने बेंगलोर येथून ॲमेझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण १ कोटी ५३ लाख ९३ हजार ३०० रुपयांचा माल भरला. मात्र पुणे आंबेठाण येथे आले असता त्यातील ४८ लाख ६९ हजार ९५३ रुपयांचा माल गायब झाला होता. यावरून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Goods of Amazon company worth Rs 48 lakh stolen from the container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.