PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 04:15 PM2024-05-23T16:15:45+5:302024-05-23T16:22:38+5:30

गुरूवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भोजपुरी कलाकारांनी भाजपसाठी प्रचार केला.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचाराचा धुराळा गुरुवारी खाली बसला. २५ मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडले. सहाव्या टप्प्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशातील १४ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये तेथील आझमगढ या मतदारसंघाचाही समावेश आहे.

इथे भाजप आणि समाजवादी पक्षात थेट लढत होण्याची शक्यता आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भोजपुरी कलाकारांनी भाजपसाठी प्रचार केला. भाजप खासदार आणि लोकसभेचे उमेदवार दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांनी रोड शो केला.

यावेळी भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह आणि आम्रपाली दुबेने सहभाग नोंदवला. आझमगढ लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांनी आम्रपाली दुबे आणि अक्षरा सिंह या अभिनेत्रींसोबत रोड शो केला.

रोड शोदरम्यान बोलताना अभिनेत्री अक्षरा सिंहने सांगितले की, जय श्री राम... आज आझमगढची धरती 'राममय' झाली आहे. मला आशा आहे की, 'अब की पार 400 पार' हे निश्चित आहे. मोदी आणि निरहुआ दोघेही पुन्हा येतील यात शंका नाही. इथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित असून, यापेक्षा मोठी बाब असू शकत नाही. अक्षरा ANI या वृत्तसंस्थेशी बोलत होती.

भाजपा उमेदवार निरहुआ म्हणाले की, इंडिया आघाडीला पराभव दिसत असल्याने ते खोटं बोलत आहेत. ते कधी ईव्हीएमला दोष देतात तर कधी आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करतात. म्हणूनच देशातून काँग्रेस आणि समाजवादी पार्टी संपणार आहे.