शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : पहाटेची डेमू धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:42 AM

पुणे-दौंड रेल्वे प्रवाशांसाठी एक गोड बातमी आहे. ११ जून रोजी सकाळी दौंडहून पुण्याकडे जाण्यास पहिली दौंड-पुणे डेमू लोकल (७१४०७) पहाटे ५.४० वाजता धावणार आहे.

केडगाव : पुणे-दौंड रेल्वे प्रवाशांसाठी एक गोड बातमी आहे. ११ जून रोजी सकाळी दौंडहून पुण्याकडे जाण्यास पहिली दौंड-पुणे डेमू लोकल (७१४०७) पहाटे ५.४० वाजता धावणार आहे. तसेच, रात्री ३.१५ ला पुण्याहून-दौंडकडे डेमू (७१४०८) या दोन लोकल धावणार आहेत.दौंडवरून पुण्याकडे धावणारी लोकल मधल्या सर्व स्थानकांवर थांबेल, तर पुण्यावरून दौंडकडे जाणारी लोकल फक्त लोणी काळभोर, उरुळी कांचन व केडगाव या तीन स्थानकांवर थांबणार आहे. ही लोकल प्रायोगिक स्वरुपात तीन महिन्यांसाठी करण्यात येणार आहे. यशस्वी झाल्यास कायमकरण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.यापूर्वी २००४ पर्यंत दौंड - पुणे रेल्वेमार्गवर पहाटे दौंड रेल्वेस्थानकावरून ४.४० वाजता दौंड-पुणे शटल सोडण्यात येत होती. परंतु ती काही कारणास्तव रेल्वे प्रशासनाने बंद केली. तब्बल १४ वर्षांनंतर प्रवाशांच्या आग्रहास्तव रेल्वेमार्गावर ही डेमू लोकल चालू होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणारी प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यात येणार आहे.पाटस ते हडपसरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. यासाठी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा, वरिष्ठ मार्गदर्शक जयप्रकाश अग्रवाल, वरिष्ठ राजेंद्र शहा व सचिव दिलीप होळकर यांनी २ मे २०१८ रोजी सोलापूर डिव्हिजनच्या अधिकाºयांना मागणी केली होती. या पथकाने अधिकाºयांना पहाटे धावणाºया सोलापूर व मनमाड पॅसेंजर या गाड्या दररोज उशिरापर्यंत धावत आहेत. यामुळे पुण्याकडे जाणाºया चाकरमानी, नोकरदार, विद्यार्थी, दूधवाले, भाजीविक्रेते यांचे हाल होत आहेत. परिणामी दररोज गाड्या उशिरा असल्याने हजारो प्रवासी पुणे-सोलापूर महामार्गाने मिळेल त्या वाहनाने प्रवास करून पुण्याला जातात, ही बाब निदर्शनास आणली होती.‘लोकमत’नेही प्रवाशांच्या पहाटेच्या होणाºया गैरसोयीबद्दल वारंवार आवाज उठवला होता. अखेर रेल्वे प्रशासनाने पुणे मंडल व सोलापूर मंडल यांच्या सहकार्याने सकाळी ५.४० वाजता दौंडहून पुण्याकडे दौड-पुणे डेमू लोकलचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. रेल्वे प्रवासी ग्रुपने वारंवार रेल्वे प्रशासनास केलेल्या पाठपुराव्यात यश आले. यामुळे पाटस ते हडपसरदरम्यान प्रवास करणाºया हजारो प्रवांशाना मोठा दिलासा मिळणार आहे.ही डेमू लोकल तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी दौंडकडे रवाना होईल. यामध्ये लोणी उरुळी व केडगावया तीन रेल्वेस्थानकावर थांबादेण्यात येणार आहे व ही डेमूलोकल पहाटे पाच वाजेपर्यंतदौंड स्थानकावर पोहोचणार आहे व नंतर ही डेमू लोकल दौंड रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे ५.४० वाजता रवाना केली जाईल.डेमूच्या स्वागतासाठी प्रवासी सज्ज४ही डेमू निघताना दौंड येथे प्रस्थान कार्यक्रम आहे. मार्गावरील पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी, हडपसर येथे हजारो प्रवासी स्वागताचा कार्यक्रम घेणार असल्याचे केडगाव प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पोपट चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेlocalलोकलnewsबातम्या