शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पुणेकरांसाठी खूशखबर! पीएमपीची शनिवार, रविवारी विशेष सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 6:44 PM

विना वातानुकूलित बस नागरिकांना खासगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार

ठळक मुद्देराज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्याने महिन्यात २ ते ३ शनिवार सुट्या वाढल्या सकाळी ६ ते २ आणि दुपारी २ ते १० अशी दोन सत्र पीएमपीच्या ताफ्यात सध्या नव्याने दाखल झालेल्या १२ मीटर लांबीच्या ‘सीएनजी’ बस

पुणे : सुटीच्या दिवशी मार्गावर कमी बस येत असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ला कमी उत्पन्न मिळते. हे उत्पन्न भरून काढण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवारी विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विना वातानुकूलित बस नागरिकांना खासगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर काम केले जात आहे. मागील महिन्यापासून सुरू करण्यात आलेला ‘बस डे’ हा त्याचाच एक भाग आहे. तसेच, तिकीट चेकरच्या संख्येत वाढ, अधिकाधिक बस मार्गावर आणण्याची धडपड, अधिक उत्पन्न आणणाऱ्या चालक व वाहकांना प्रोत्साहन भत्ता, जाहिरातबाजी अशा विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्याने महिन्यात २ ते ३ शनिवार सुट्या वाढल्या आहेत. त्यामुळे पीएमपीच्या मासिक उत्पन्नात आणखी घट होणार आहे. सुटीच्या दिवशी प्रतिसाद कमी मिळत असल्याने मार्गावरील बसची संख्या कमी केली जाते. या बस आगारामध्ये उभ्या असतात. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.आगारामध्ये उभ्या असलेल्या विना वातानुकूलित बस नागरिकांना खासगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यासाठी विशेष दर आकारले जाणार आहेत. सकाळी ६ ते २ आणि दुपारी २ ते १० अशी दोन सत्र करण्यात आली आहे. एका सत्रासाठी प्रतिदिन आठ हजार रुपये दर आकारला जाईल. तर, संपूर्ण १२ तासांसाठी बस हवी असल्यास एकूण १६ हजार रुपये दर आकारण्यात येणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात सध्या नव्याने दाखल झालेल्या १२ मीटर लांबीच्या ‘सीएनजी’ बस आहेत. प्रामुख्याने या बससेवेसाठी उपलब्ध असतील. तसेच भविष्यात वातानुकूलित ई-बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याची माहिती वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.-----------बस बुकिंगसाठी - बस बुक करण्यासाठी सोमवार ते शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कार्यालयीन वेळेत वाहतूक व्यवस्थापक विभागात चौकशी करता येईल. बसचे पैसे डीडीद्वारे किंवा रोखीने भरता येतील. बुकिंगसाठी ०२०- २४५०३३०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.--------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासी