शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

गुड न्यूज! अखेर बर्ड फ्लू हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 8:55 PM

नंदूरबार अमरावती वगळता राज्यातून बर्ड फ्लू हद्दपार पशुसंवर्धन विभाग: प्रयोगशाळेतून इतरत्रचे नमुने निगेटिव्ह

 महिनाभरापुर्वी कोरोना विषाणूच्या बरोबरीनेच प्रादुर्भाव करत असलेल्या बर्ड फ्लू या पक्ष्यांमधील साथीच्या आजाराचा प्रभाव आता बराच ओसरला आहे. नंदूरबार अमरावती हे दोन जिल्हे वगळता राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमधील मृत पक्ष्यांचे नमुने आता भोपाळ प्रयोगशाळेतून निगेटिव्ह निष्कर्षाचे येत आहेत.हे दोन जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये पाळीव पक्षी किंवा स्थलांतरीत पक्षी यांच्यात अकस्मात मृत्यूचे प्रमाण एकदम कमी झाले आहे अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. महिनाभरापुर्वी हे प्रमाण बरेच होते. त्यातही कावळे, पोपट तसेच पाळीव कोंबड्या फार मोठ्या प्रमाणावर संसर्गित झाल्या होत्या. मात्र या जिल्ह्यांमध्ये आता ही साथ पुर्णपणे आटोक्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे.  अकस्मात एकदम जास्त मृत्यू होत नाहीत, व जे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात त्यांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.  नंदूरबार व अमरावतीमध्ये ही साथ ओसरण्याचे अजूनही चिन्ह नाही. आतापर्यंत तिथे तब्बल ८ लाख ९८ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. अजूनही तिथे कोंबड्यांमध्ये अकस्मात मृत्यूचे प्रमाण बरेच आहे. ते नमुने तपासणीसाठी भोपाळला प्रयोगशाळेत पाठवले की त्याचे अहवाल पॉझेटिव्ह (बर्ड फ्लू आहे) येत असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने तिथे काळजी घेण्यात येत आहे.पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात आले की या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुक्कुट पालनाचा (पोल्ट्री) व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. या कोंबड्यांच्या शेड पाणवठा असलेल्या ठिकाणी आहेत. तिथे स्थलांतरीत पक्षी येतात. त्यांच्याकडून या कोंबड्यांना संसर्ग होतो. नियमाप्रमाणे संसर्गित कोंबडी सापडली की लगेचच त्याच्या १ किलोमीटर परिघातल्या पोल्ट्री फार्ममधील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येतात. दोन्ही जिल्ह्यांमध्ये संसर्गित पक्षी सापडण्याचे प्रमाण जास्त असल्याने आता साथ आटोक्यात आणण्यासाठी तिथे लक्ष केंद्रीत केले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.स्थलांतरीत पक्षी पाणवठ्यांवर येतात. ते आता मोठ्या संख्येने परत जाऊ लागले आहेत. नंदूरबार, अमरावतीमध्येही येत्या काही दिवसांमध्ये बर्ड फ्लूचे प्रमाण एकदम कमी होईल. तरीही पोल्ट्री फार्म चालकांनी आपले पक्षी अन्य पाळीव किंवा स्थलांतरीत पक्ष्यांच्या संपर्कात येणार नाहीत, त्यांची विष्ठा किंवा पंख वगैरे पोल्ट्रीत जाणार नाही याची काळजी घेणे अजूनही गरजेचे आहे.डॉ. धनंजय परकाळे- अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेBird Fluबर्ड फ्लूHealthआरोग्य