शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर! राज्यात मॉन्सून दाखल, पुढील ३,४ दिवस पावसाची शक्यता

By श्रीकिशन काळे | Updated: June 6, 2024 14:33 IST

गुरूवारी आणि शुक्रवारी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

पुणे : महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदवार्ता असून, मॉन्सून राज्यात दाखल झाला आहे. आज (दि.६ जून) गुरूवारी मॉन्सून कोकणात आला आहे त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश आहे. तसेच सोलापुरात देखील तो आला असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कृष्ण‌ानंद होसाळीकर यांनी दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल अतिशय हळू सुरू होती. केरळमध्ये काही दिवस मुक्काम होता. त्यानंतर आंध्रप्रदेश, कर्नाटकात काही काळ थांबला होता. आज मात्र त्याने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. हा मॉन्सून रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेढक, भद्राचलम, विजयनगर आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून पुढे सरकला आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यामध्ये आजपासून पुढील तीन-चार दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरूवारी आणि शुक्रवारी (दि.७) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज गुरूवारी तर, शुक्रवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसWaterपाणीDamधरणTemperatureतापमान