शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! सायकल खरेदीसाठी आता ५ हजार रूपये मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 20:04 IST

शासनाने अनुदानात दीड हजाराने वाढ केल्यामुळे आठवी ते बारावीच्या मुलींना होणार फायदा

पुणे : राज्यातील २३ जिल्ह्यांतील १२५ अतिमागास तालुक्यांत ‘मानव विकास कार्यक्रम’ राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून ५ कि. मी. अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलींचे वाटप करण्यासाठी योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. सुरूवातीला ३ हजार रूपये अनुदान होते. त्यात नंतर ५०० रूपयांची वाढ केली होती. आता १६ फेब्रुवारी रोजी आणखी दीड हजार रूपये वाढवून ५ हजार रूपये करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे.

लाभार्थी मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी ३ हजार रूपये इतकी रक्कम आरटीजीएसद्वारे (R.T.G.S.) लाभधारक मुलीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यास डीबीटी मान्यता दिली आहे. त्यानंतर २३ मार्च २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रति लाभधारक मुलींसाठी रकमेत वाढ करून ती ३ हजार ५०० रूपये इतकी, तर आता प्रति लाभार्थी ५ हजार रूपये इतके करण्यास मान्यता दिली आहे.

कशी मिळणार सायकल...  

* पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयकृत बँक खात्यात डीबीटीद्वारे ३ हजार ५०० रूपये आगाऊ रक्कम जमा करण्यात येईल.* दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना उर्वरीत १ हजार ५०० रूपये इतके अनुदान थेट डीबीटीद्वारे खात्या जमा करण्यात येईल.* गरजू मुली ज्या शासकीय शाळा, जिल्हा परिषद शाळा, शासकीय अनुदानित शाळा, तसेच ज्या अनुदानित व शासकिय आश्रमशाळेमधील मुलींना डे-स्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्यांना दररोज घरापासून ये-जा करावी लागत आहे.* गरजू मुलींना ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शालेय शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात सायकल खरेदी करण्याची स्वायत्तता राहिल व त्यांना या चार वर्षामध्ये सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान देय राहणार आहे.* गरजू मुलींना सायकल वाटप करताना पूर्वीच्या निकषांसोबतच “जी गावे/ वाड्या/तांडे/पाडे हे डोंगराळ व अतिदुर्गम भागात आहेत व जिथे जाण्यासाठी सुयोग्य रस्ते नाहीत तथा वाहतुकीची पुरेशी साधने/व्यवस्था उपलब्ध नाही, अशा ठिकाणी राहणाऱ्या गरजू मुलींना प्राधान्य देण्याचे शासनाने आदेश दिले आहेत.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्र