शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी; पाणीटंचाई पासून मुक्तता, उजनीतून पाणी सोडण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 13:55 IST

सोलापूर शहर, भीमा नदी काठची शहरे व गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी हे पाणी सोडण्यात येत आहे

इंदापूर : भीषण पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणाच्या गाळमो-यातून पंधराशे क्यूसेस क्षमतेने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूरकरांसाठी ही आनंदाची बाब असली तरी आधीच वजा ४५ टक्के पाणी उरलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा वजा ६० टक्क्यांपर्यंत खालावला जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर ही उजनी धरणाच्या इतिहासातील सर्वात नीचांकी पातळी ठरणार आहे.

 सोलापूर शहर, भीमा नदी काठची शहरे व गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी हे पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरणाच्या चार गाळ मोऱ्यातून हे पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनाच्या अधिका-यांनी दिली.    एकंदर साडेपाच टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. दि.२० मे पर्यंत हे पाणी सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र भीषण पाणीटंचाई, जागोजाग कोरडे पडलेले भीमा नदीचे पात्र यामुळे तीव्र उन्हाळा जमिनीत किती पाणी मुरवेल, किती पाण्याचे बाष्पीभवन होईल यावर पाण्याच्या प्रवासाचा कालावधी अवलंबून असणार आहे. हे दिव्य पार केल्यानंतर उपलब्ध झालेले पाणी सोलापूर शहराला पुढील पन्नास दिवस काटकसरीने पुरवावे लागणार आहे. या सा-या घडामोडींमध्ये इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्रातील पाणी योजनांच्या तोंडचे पाणी पळणार आहेच, या खेरीज परिसरातील तळ गाठलेल्या विहिरी देखील कोरड्या पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीRainपाऊसTemperatureतापमान