शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पात चांगली वाढ

By admin | Updated: August 4, 2014 04:19 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सर्व धरणांमध्ये सरासरी ५४.८६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ येडगाव धरण ९० टक्के तर वडज धरण ८६.४३ टक्के भरले आहे़ या दोन्ही धरणांमधून अतिरिक्त पावणेदोन टी़ एम़ सी़ पावसाचे पाणी नदी व कालव्याद्वारे सोडण्यात येत आहे़, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १ चे कार्यकारी अभियंता शिवाजीराव बोलभट यांनी दिली़पाच धरणांमध्ये १६७०० द़ ल़ घ़ फूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी या दिवसाअखेर २२२०५ द़ ल.घ़ फूट पाणीसाठा (७२.७१ टक्के) उपलब्ध होता़ १ जूनपासून झालेल्या पावसामुळे पाचही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १९ टी़ एम़ सी़ पाणी आले़ त्यापैकी अतिरिक्त पावसाचे पावणेदोन टी़ एम़ सी़ पाणी नदी व कालव्यांद्वारे सोडण्यात आले आहे़ वर्षभरात प्रथमच मीना नदीला पाणी सोडण्यात आल्यामुळे या नदीच्या पात्रात असलेले डे्रनेजचे पाणी वाहून गेल्याने मीना नदीतील दुर्गंधी कमी झाली आहे़ वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १०११ द़ ल.़ घ़ फूट (८६.४३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.़ दिवसभरात ५७ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ १ जूनपासून आजअखेर ३३७ मि़ मी़ पाऊस या धरणक्षेत्रात झालेला आहे़ (वार्ताहर)