शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

कौतुकास्पद निर्णय; पुण्यातील ५० गणेश मंडळांचा मांडव न घालता मंदिरातच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 5:52 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आणि प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

ठळक मुद्देमंदिरातच केली जाणार श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पुण्यातील बाबू गेनू, हत्ती गणपती, छत्रपती राजाराम मंडळ यांसह कोथरूड, बिबवेवाडी आदी उपनगरांमधील जवळपास 50 गणेश मंडळांनी एकत्र येत  मांडव न घालण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरांमध्येच श्रींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.      कोणत्याही संकट किंवा आपत्ती काळात गणेश मंडळांनी पुढाकार घेत सामाजिक भान राखणारी भूमिका घेतली आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने साधेपणाने उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्याला गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हुतात्मा बाबुगेनू मंडळ ट्रस्ट च्या वतीने पुणे शहरातील साव॔जनिक गणेशोत्सव मंडळाच्या  पदाधिका-यांची नवसाच्या गणपती मंदिरात शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सहभागी झालेल्या गणेश मंडळाच्या वतीने रस्त्यावर मंडप न टाकता  यंदाचा गणेशोत्सव अत्यन्त  साध्या पद्धतीने मंदिरात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पुणे शहरातील 50 मंडळाच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आला .त्यानुसार या संदर्भातील ठरावाचे निवेदन परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या कडे देण्यात आली आहे.

    मंदिरामध्ये छोट्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. मंडळाचे पाच कार्यकर्ते रोजची आरती , प्रसाद , पूजा या गोष्टी करतील. भाविकांच्या दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल.मात्र भाविकांनी दर्शनासाठी गर्दी न करण्याकरिता गणेशोत्सव हा इंटरनेटचा वापर करून लाईव्ह करण्याचा देखील  मंडळांचा विचार आहे....….यंदा कोरोनामुळे मंडप न टाकता मंदिरातच उत्सव साजरा केला जाणार आहे. आम्ही दरवर्षी मंडप  पडदा लावून बंद करत नाही त्यामुळे कोरोना काळात उद्या भाविक, कार्यकर्ते कुणाला जर लागण झाली तर मंडप बंद करू शकणार नाही. पण आम्ही मंदिराचे दार बंद करू शकतो. भाविकांना दर्शनासाठी सोशल डिस्टनसिंगचे रिंगण केले आहे. भाविकांनी दर्शन घेत बाहेर जाण्याची सुविधा केली  आहे- बाळासाहेब मारणे, हुतात्मा बाबू गेनू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ..... कोथरूड, येरवडा, बिबवेवाडी यांसह काही गणेश मंडळांनी दहा दिवस उत्सव काळातले कार्यक्रम मंडप न करता मंदिरात करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पोलीस आणि आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. तो आम्ही कमी कसा करायचा याचा विचार आम्ही केला. मंदिरातला छोटा विसर्जनाचा गणपती आम्ही मंदिरातच विसर्जन करणार आहोत. इतर गणेश मंडळांनी याचे अनुकरण करावे- श्याम मानकर, हत्ती गणपती मंडळ...

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका