पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पुण्यातील बाबू गेनू, हत्ती गणपती, छत्रपती राजाराम मंडळ यांसह कोथरूड, बिबवेवाडी आदी उपनगरांमधील जवळपास 50 गणेश मंडळांनी एकत्र येत मांडव न घालण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरांमध्येच श्रींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. कोणत्याही संकट किंवा आपत्ती काळात गणेश मंडळांनी पुढाकार घेत सामाजिक भान राखणारी भूमिका घेतली आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने साधेपणाने उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्याला गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हुतात्मा बाबुगेनू मंडळ ट्रस्ट च्या वतीने पुणे शहरातील साव॔जनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिका-यांची नवसाच्या गणपती मंदिरात शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सहभागी झालेल्या गणेश मंडळाच्या वतीने रस्त्यावर मंडप न टाकता यंदाचा गणेशोत्सव अत्यन्त साध्या पद्धतीने मंदिरात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरातील 50 मंडळाच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आला .त्यानुसार या संदर्भातील ठरावाचे निवेदन परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या कडे देण्यात आली आहे.
कौतुकास्पद निर्णय; पुण्यातील ५० गणेश मंडळांचा मांडव न घालता मंदिरातच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 17:57 IST
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आणि प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
कौतुकास्पद निर्णय; पुण्यातील ५० गणेश मंडळांचा मांडव न घालता मंदिरातच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय
ठळक मुद्देमंदिरातच केली जाणार श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना