'Goldman' in Pune in trouble; Filed a case of abortion by abusing his wife | पुण्यातील 'गोल्डमॅन' अडचणीत ; पत्नीचा छळ करून गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यातील 'गोल्डमॅन' अडचणीत ; पत्नीचा छळ करून गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ठळक मुद्देमानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याचे पोलीस तक्रारीत फिर्यादीने नमूद

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात 'गोल्डमॅन' म्हणून परिचित असलेल्या सनी वाघचौरेवर आणि त्याच्या कुटुंबावर माहेरहुन गृहपयोगी वस्तू आणाव्यात यासाठी पत्नीचा छळ करून गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी वाघचौरे याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पतीसह सासू आशा नाना वाघचौरे (वय ५६), सासरे नाना वाघचौरे (वय ६०), नणंद नीता गायकवाड (वय ३६, सर्व रा. संतोषी माता मंदिरामागे नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

'गोल्डमॅन' म्हणून परिचित असलेल्या सनी वाघचौरे हा कॉमेडियन कपिल शर्माचा मित्र आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्जज कलाकारांसोबत गोल्डमॅन सनीची ओळख असून त्यांच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डमॅन सनी वाघचौरेसह त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी पत्नीला मारहाण करून, शिवीगाळ करत गर्भपाताची औषधे देऊन गर्भपात करण्यात आला. तसेच त्याने बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा देखील उल्लेख पत्नीने फिर्यादीत केला आहे.  

'गोल्डमॅन' म्हणून परिचित असलेल्या सनी वाघचौरे याने फिर्यादी यांच्या आई-वडिलांकडे गृहपयोगी वस्तूची मागणी केली होती. पती सनी, सासरे, सासू आणि नणंद यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याचे पोलीस तक्रारीत फिर्यादीने नमूद केले आहे.  या प्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Goldman' in Pune in trouble; Filed a case of abortion by abusing his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.