शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

पूर्णत्वाचा दाखला देण्यापूर्वी इमारतीप्रमाणे सीमाभिंतीची सक्षमता पाहणे आवश्यक: रामचंद्र गोहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 7:00 AM

पुण्यात काही दिवसांपूर्वी सीमाभिंत कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या, त्या पार्श्वभूमीवर सीमाभिंत बांधकामा नेमके कसे असावे याविषयी माहितीपूर्ण लेख

ठळक मुद्देभौगोलिक उंच-सखलपणा लक्षात न घेता केले जाते बांधकाम

पुणे : पुणे शहरातील ट्रॉपोग्राफी भौगोलिक रचना ही उंच सखल आहे़ विशेषत: शहराच्या उपनगरांमध्ये ते अधिक आहे़.असे असताना इमारती बांधताना त्याचा विचार न करता बांधकाम केले जाते़. इमारतीप्रमाणेच त्याची सीमाभिंतीसाठी पाया घेणे व ती सक्षम आहे की नाही, हे पाहणे महापालिकेच्या बांधकाम विभागाची जबाबदारी आहे़. त्याविषयी खात्री केल्याशिवाय त्यांनी पूर्णत्वाचा दाखला देणे अयोग्य आहे़. त्यामुळे कोंढव्यातील इमारतीला पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर काही दिवसात त्याची सीमा भिंत कोसळून १५ कामगारांच्या मृत्यु प्रकरणात महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरच बांधकाम व्यावसायिक व ठेकेदारही तितकेच जबाबदार आहेत, असे ज्येष्ठ नगररचनाकार तज्ञ रामचंद्र गोहाड यांनी सांगितले़. कोंढव्यातील अ‍ॅक्लोन स्टायलीस या सोसायटीची सीमाभिंत कोसळून त्यात १५ कामगारांचा मृत्यु झाला होता़. त्यापाठोपाठ सिंहगड इस्टिट्युटची सीमाभिंत कोसळून ६ कामगारांचा मृत्यु झाला होता़.  याबाबत रामचंद्र गोहाड यांनी सांगितले की, पूर्वी नगर रचना कायदा होता़. त्यानंतर १९५४ मध्ये विकास योजना आली़. त्यानंतर १९६६ मध्ये डेव्हलपमेंट प्लॅन आला़. १९७५ साली त्यासंबंधी नियम आले़. त्यावर केंद्र सरकारने एक कमिटी नेमली़ त्यांनी सर्व राज्यात जाऊन तेथील नियमांचा अभ्सास केला़ त्यावरुन प्रमाणित नियमावली तयार केली़. त्यानुसार इमारतीच्या सुरक्षिततेप्रमाणेच त्या जागेसभोवताली बांधलेल्या सीमाभिंतीचे बांधकामाबाबतही नियम तयार करण्यात आले आहेत़. त्यानुसार सीमा भिंत बांधताना इमारतीप्रमाणेच त्याचा पाया भक्कम व दीड मीटर असावा़. तो दगड बांधकामाचा असावा़. सीमा भिंतीची उंची कमीतकमी ५ फुट असावी़ अनेक ठिकाणी विशेषत: अनेक पंचताराकिंत हॉटेल व काही सोसायट्या अगदी ७ फुटापर्यंत उंच सीमाभिंत बांधतात़. ही सीमा भिंत बांधताना त्याचे बांधकाम किमान ११ इंच जाडीची असावे़.  त्याच्या दोन्ही बाजूने प्लॉस्टर असावे़. तसेच सीमा भिंतीत अडीच ते तीन फुटानंतर सिमेंट, लोखंड, खडी यांची पडदी टाकणे बंधनकारक आहे़. महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याची त्याच्या क्षेत्रातील बांधकामांची तपासणी करण्याचे काम असते़. इमारतीच्या जोत्याच्या वेळी सीमाभिंतीचे बांधकाम झाले असेल तर त्यावेळी त्याने तपासणी करावी़. इमारतीला बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यापूर्वी सीमा भिंतीची तपासणी करणे व तिचे बांधकाम करताना नियमावलीचे पालन केले आहे, याची तपासणी करुन खात्री करण्याची जबाबदारी या अभियंत्याचे आहे़. त्याचबरोबर नियमानुसार सीमा भिंतीचे बांधकाम करण्याची जबादारी विकसकावरही आहे़. त्यामुळे कोंढव्यातील दुर्घटनेत जसे त्यांना पूर्णत्वाचा दाखला देणारा अधिकारी जबाबदार आहे़. त्याचप्रमाणे विकासकही तितकाच जबाबदार आहे़ दत्तवाडी येथे सीमाभिंत कोसळून त्यात काही जणांचा मृत्यु झाला होता़. त्यानंतर सीमाभिंतीचे बांधकाम आरसीसीमध्ये  केलेला ठेकेदार व त्या सिमा भिंतीचे डिझाईन केलेल्या डिझायनर यांचे ती सीमाभिंत सक्षम असल्याबाबतचे सर्टिफिकेट घेण्याचा नियम महापालिकेने केला आहे़.

टॅग्स :Puneपुणे