शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'सारथी' संस्थेला कायमस्वरूपी इमारतीसाठी जागा द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 12:03 IST

सारथी संस्थेने सर्वंकष नियोजन सादर केल्यानंतर पुढील आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

ठळक मुद्देअजित पवार यांच्याकडून सारथी संस्थेला भेट व पाहणी

पुण्यामध्ये सारथी संस्थेच्या कार्यालयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. कार्यालयातील छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.  सारथी संस्थेतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामकाजाची माहिती घेतली. सारथी संस्थेत झालेल्या बैठकीमध्ये सारथी संस्थेला कायमस्वरूपी नवीन इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. तसेच कामाला योग्य दिशा व गती देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यास संदर्भातले आश्वासन देण्यात आले. गरज ओळखून व भविष्याचा वेध घेऊन नवीन प्रकल्प तयार करण्यात यावेत तसेच जुन्या प्रकल्पांचे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत असे निर्देश देण्यात आले.  तसेच संस्थेने पुढील दहा वर्षाचे 2020 ते 2030 व्हिजन डॉक्युमेंट चे सर्वंकष नियोजन केल्यानंतर पुढील आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.  दोन दिवसापूर्वी सारथी संस्थेबाबत मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आठ कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून तात्काळ देण्यात आला होता. परंतु, सारथी संस्थेसाठी अधिकचा निधी आवश्यक असल्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती. तसेच अन्य प्रश्नाबाबत देखील लक्ष घालण्याची सूचना मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी केली होती. या पार्श्वभूमीवर ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेची भेट घेत येथील कामकाजाची पाहणी केली.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीmarathaमराठाstate transportएसटीNavalkishor Ramनवलकिशोर राम