शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:37 IST

झोपलेले सरकार जागे व्हा :बारामती प्रशासकीय भवना समोर ठिय्या 

सांगवी (बारामती) : झोपलेले सरकार जागे व्हा, पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगर येथील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर खाऊच्या आमिषाने झालेला अत्याचार  व नंतर निर्घुण हत्ये प्रकरणी नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा देऊन बालिकांना न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करत बारामतीच्या प्रशासकीय भवना समोर गोसावी समाजाच्या वतीने संतप्त प्रतिक्रिया देऊन आक्रोश करत विविध मागण्या केल्या. अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी गोसावी समाजाच्या वतीने करण्यात आली. 

राजगुरुनगरमध्ये बलात्कार करून हत्या करणारा हॉटेलमधील वेटर अजय दास (वय ५४, रा. पश्चिम बंगाल) याने आठ व नऊ वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची निर्घुण हत्या करून दोघींचेही मृतदेह दोन दिवस पाण्याच्या बॅरलमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. राजगुरूनगर येथे घराबाहेर खेळत असताना दोन चिमुकल्या सख्या बहीणी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह एका बॅलर मध्ये आढळून आले होते.राजगुरूनगर येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणाचे पडसाद बारामतीत उमटताना दिसले. या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत नागरिकांनी आंदोलन केलं आहे.  बारामती प्रशासकीय भवना समोर लहान मुलींपासून अबाल वृध्द महिलांनी ठिय्या दिला.

गोसावी समाजाच्या वतीने निवेदनगोसावी समाजातील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली २५ डिसेंबर २०२४ रोजी घरातून अचानक गायब झाल्याने अनेकदा शोधाशोध केल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिल्यानंतर त्यांना काही वेळानंतर अत्यंत निंदनीय अशी घटना समोर आली.

दोघींची निर्घुण हत्या करण्यात करण्यात आली या घटनेने संपुर्ण महाराष्ट्रा  मधील गोसावी समाजास या घटनेने पूर्ण हादरून टाकले होते. तसेच कोणी नराधमाने हे कृत्य केले आहे, त्याला योग्य ते शासन झालेच पाहिजे. सदर आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशा दृष्ट विकृत प्रवृत्तीना आळा बसावा पुन्हा असे प्रकार घडु नयेत म्हणून आमच्या गोसावी समाजास न्याय मिळावा. पीडीत कुटूबियांना योग्य न्याय मिळावा असे बारामतीचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात गोसावी समाजाच्या वतीने म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालयMahayutiमहायुतीGovernmentसरकार