शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'दिव्यांगांना ६ हजार पेन्शन द्या', बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर प्रहारचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 17:42 IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांशी आमचं कोणाचं बोलणं होत नाही तोपर्यंत आम्ही येथून माघार घेणार नाही, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

बारामती : मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' या योजनेप्रमाणे राज्यातील दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन द्यावी, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने बारामती येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीसमोर शनिवारी(दि ५) ठिय्या आंदोलन करण्यात आले.          त्याचबरोबर दिव्यांगांसाठी राजकीय आरक्षण लागू करावं, या मागणीसाठी प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शाखेच्या वतीने  आंदोलन करण्यात आले. राज्यातील दिव्यांगांना ६,००० रुपये पेन्शन द्यावी, बेघर, भूमीहीन दिव्यांगांना घरासाठी नऊ गुंठे जागा द्यावी, राज्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना दहा टक्के आरक्षण द्यावे, औद्योगिक वसाहती मध्ये दिव्यांगांना चार टक्के रोजगार उपलब्ध करून द्यावा, ग्रामपंचायत, नगर परिषद, महापालिका हद्दीतील दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी गाळे, स्टॉल द्यावे, औंध रुग्णालय या ठिकाणी दिव्यांगांसाठी ५ टक्के निधीतून दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या इमारतीचे काम सूरू आहे, मात्र या कामात प्रचंड अनियमितता सुरू असून याप्रकरणी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर करवाई करावी, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयाची पुणे येथील इमारत प्रशस्त पद्धतीने बांधण्यात यावी,आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांच्याशी संबंधित कोणाचं बोलणं होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून माघार घेणार नाही, असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला.

यावेळी शासकीय अधिकारी यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. उशिरा पर्यंत हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद जाधव, महिला जिल्हाध्यक्ष अनिता कदम, पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर, संपर्क प्रमुख ज्ञानदेव मिंढे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पवार यांच्या निवासस्थान समोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPrahar Apang Krantiप्रहार अपंग क्रांतीBachhu Kaduबच्चू कडूDivyangदिव्यांगMONEYपैसा