दहावीत नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:58 IST2018-06-11T23:58:11+5:302018-06-11T23:58:45+5:30
दहावीच्या परीक्षेत यश हाती न आल्याने पिंपरी (अंतूर, ता.सोयगाव) येथील विद्यार्थिनीने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. भाग्यश्री कोमलसिंग दौडे (१६), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सदर विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.८) घरीच विष प्राशन केले होते. ही बाब लक्षात येताच उपचारासाठी नगरदेवळा (ता.पाचोरा) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दहावीत नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सोयगाव : दहावीच्या परीक्षेत यश हाती न आल्याने पिंपरी (अंतूर, ता.सोयगाव) येथील विद्यार्थिनीने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
भाग्यश्री कोमलसिंग दौडे (१६), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सदर विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.८) घरीच विष प्राशन केले होते. ही बाब लक्षात येताच उपचारासाठी नगरदेवळा (ता.पाचोरा) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने तिला चाळीसगावच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेली आकस्मिक मृत्यूची नोंद सोयगाव पोलीस ठाण्याला (दि.११) वर्ग करण्यात आली आहे.
भाग्यश्री चाळीसगावच्या राष्ट्रीय कन्याशाळा येथे इयत्ता दहावीचे शिक्षण घेत होती. अल्पभूधारक जमीन असल्याने ती मुलींच्या वसतिगृहात वास्तव्यात होती. मात्र, दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याने तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. अधिक तपास पोनि. सुजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश जागडे, योगेश झाल्टे, दीपक पाटील, कौतिक सपकाळ, प्रदीप पवार करीत आहेत.
दरम्यान, भाग्यश्रीचे आयपीएस होण्याचे स्वप्न होते. आई-वडिलांची परिस्थिती गरीबीची असल्याने आपण चांगले शिक्षण घेऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करू, अशी भाग्यश्रीची इच्छा होती. परंतु नियतीला हे मंजूर नसावे.