Pune | आत्महत्या करण्यासाठी चढली पुलावर; पोलिसांमुळे वाचले मुलीचे प्राण, RTO चौकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 16:01 IST2023-04-03T16:00:02+5:302023-04-03T16:01:22+5:30
मुलीस तिच्या आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले...

Pune | आत्महत्या करण्यासाठी चढली पुलावर; पोलिसांमुळे वाचले मुलीचे प्राण, RTO चौकातील घटना
पुणे : पुणे शहरातील आरटीओ चौकात एक मुलगी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने ब्रीजवर उभी होती. त्या चौकात वाहतूक नियोजन करणारे पोलिस हवालदार कुचेकर व चव्हाण यांचे तिच्याकडे लक्ष गेल्याने मुलीचे प्राण वाचले आहेत. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून एका मोटरसायकलवरील दोन महिलांच्या मदतीने मुलीला विचारपूस करायला लावली. तिच्याशी बोलून तिला शांत केले. त्यानंतर लगेचच दामिनी पथकातील मार्शलला बोलावून घेऊन मुलीस तिच्या आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले.
आरटीओ चौकात एक मुलगी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने ब्रीजवर उभी दिसल्याने चौकातील पोहवा कुचेकर व चव्हाण यांनी प्रसंगावधान राखून एका मोटरसायकल वरील दोन महिलांचे मदतीने मुलीला विचारपूस करून शांत केले. लगेचच दामिनी मार्शलला बोलून घेऊन मुलीस तिच्या आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले. pic.twitter.com/xfYZSEgDpu
— Pune City Traffic Police (@PuneCityTraffic) April 3, 2023