शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

पिंपळे सौदागर येथील तरुणाच्या हत्याप्रकरणात मुलीला सहआरोपी करावे : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 9:02 PM

आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

ठळक मुद्देपिंपळे सौदागर येथे पीडित कुटुुंबाची घेतली भेट प्रेमप्रकरणातून खून करण्यात आल्याचा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात दाखल

पिंपरी : प्रेमप्रकरणातून पिंपळे सौदागर येथील तरुणाची हत्या झाल्याची घटना निंदनीय आहे. संबंधित मुलीला देखील या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी सूचना आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सूचना केली. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी या वेळी केली.पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या तरुणावर रविवारी, दि. ७ जून रोजी हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान सोमवारी, दि. ८ जून रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. प्रेमप्रकरणातून हा खून करण्यात आल्याचा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यानंतर पीडित जगताप कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी अनेक जणांनी त्यांची भेट घेतली. रामदास आठवले यांनी देखील शनिवारी (दि. १३) सायंकाळी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर पिंपरी येथे पत्रकार परिषदेत त्याबाबत माहिती दिली.आठवले म्हणाले, हत्याप्रकरणात पोलिसांनी चांगले काम केले. सहा आरोपींना त्यांनी पकडले आहे. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मयत तरुणाची आई व आजीची मागणी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने फोन केल्याने तरुण तेथे गेला. त्यावेळी त्याची क्रुरपणे हत्या झाली. मुलीने तिची भूमिका बदलली आहे. माझी आणि तरुणाची ओळख नव्हती, असे ती सांगत आहे. तसे होते तर मग फोन का केला, असा प्रश्न आहे. प्रेमप्रकरण होतं तर मुलीने मान्य करायला हवे होते. माज्यावर माज्या घरच्यांनी दबाव आणला आणि मला फोन करायला सांगून त्याला बोलावण्यास सांगितले, असे मुलीने सांगितले पाहिजे. कोणावरही अन्याय करण्याची आमची भूमिका नाही.ह्णह्ण

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेMurderखूनPoliceपोलिस