पुणे : व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ५१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खडक पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आदित्य मोहन रेळेकर (३४, रा. धनकवडे पाटील टाऊनशिप, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता), करण विजय इजंतकर (३२, रा. मेट्रो ग्रीन सोसायटी, टिळेकरनगर, कात्रज-काेंढवा रस्ता) आणि श्रीनिवास पांडुरंग बकरे (४७, रा. गुलाबनगर, धनकवडी, मूळ रा. देवाळी, ता. माणगाव, जि. रायगड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे.
याबाबत एका व्यावसायिकाने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आहेत. ते मार्केट यार्ड भागात राहायला असून, शुक्रवार पेठेत त्यांचे दुकान आहे. आरोपींशी त्यांची गेल्यावर्षी ओळख झाली होती. त्या वेळी आरोपींनी बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो, असे आमिष त्यांना दाखवले होते. चोरट्यांनी त्यांच्याकडून कर्ज मंजुरी, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी ५१ लाख रुपये घेतले. त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्हटकर करत आहेत.
Web Summary : Pune businessman lost ₹51 lakh after being promised a bank loan. Three individuals are booked for fraud related to loan processing fees and unfulfilled promises. Police investigation is ongoing.
Web Summary : पुणे के एक व्यवसायी को बैंक से कर्ज दिलाने का वादा करके 51 लाख रुपये की ठगी की गई। तीन लोगों पर कर्ज की प्रक्रिया के नाम पर धोखाधड़ी का मामला दर्ज। पुलिस जांच जारी है।