शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील हाॅटेल्स, रेस्टॉरंट व बार त्वरीत सुरू करा: पुणे जिल्हा हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 17:35 IST

पुणे जिल्ह्यातील सर्व एस. ई. झेड, एम. आय. डी. सी आणि औद्योगिक विभागातील सर्व हॉटेल ,रेस्टॉरंट आणि बार चालू करावेत..

पुणे : शहरी भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने प्रशासनाने हॉटेल्स,  रेस्टॉरंट व बार रात्री दहा पर्यंत सुरू केले आहेत. परंतु ग्रामीण भागात गेल्या एक वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने हाॅटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत. ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून, येथील हाॅटेलस् , रेस्टॉरंट व बार त्वरीत सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी लेखी मागणी पुणे जिल्हा (ग्रामीण) हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

प्रशासनाने 10 जूनपासून पुणे शहरातील रेस्टॉरंट व बार चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. ग्रामीण भागालाही आपण होम डिलिव्हरी ची परवानगी दिली आहे. पण ग्रामीण भागातील ग्राहक हा शहरातील ग्राहकांप्रमाणे सुशिक्षित आणि टेक्नॉसावी नसल्यामुळे होम डिलिव्हरी सुविधेचा उपयोग करत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील हॉटेल चालत नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील हॉटेल,  रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधे संध्याकाळी ७ वाजे पर्यंत रेस्टॉरंट व बार मधून मद्य व जेवणाची काऊंटर वरून पार्सल सुविधा त्वरित चालू करण्याची परवानगी द्यावी.आम्ही एका वेळी एकच ग्राहकास पार्सल देवू. गर्दी होवू देणार नाही. ----एमआयडीसीतील हॉटेल, रेस्टॉरंट व बार तरी सुरू करा पुणे जिल्ह्यातील सर्व एस. ई. झेड, एम. आय. डी. सी आणि औद्योगीक विभागातील सर्व हॉटेल ,रेस्टॉरंट आणि बार चालू करावेत. त्यामुळे औद्योगीक विभागातील कामगार व अधिकारी व तेथे येणाऱ्या मालवाहतूक कर्मचाऱ्यांची उदर निर्वाहाची सोय होईल. प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन आमच्या ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे ही विनंती . - बाळासाहेब दाते , अध्यक्ष पुणे जिल्हा (ग्रामीण)हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलAjit Pawarअजित पवारcollectorजिल्हाधिकारी