शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अखेर ठरलं ! कोथरुडमध्ये उभे राहणार गदिमा स्मारक; भूमिपूजनाचा कार्यक्रम एक दीड महिन्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 16:12 IST

सध्या गदिमा यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. याचे औचित्य साधून गदिमा स्मारकाच्या कामाला वेग येणार आहे

ठळक मुद्देमहापौर मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे : आपल्या सिध्दहस्त लेखणीने आणि अलौकिक प्रतिभेने ‘गीतरामायण’ अजरामर करणारे आधुनिक वाल्मिकी अर्थात ग.दि. माडगूळकर यांनी साहित्य आणि चित्रपटसृष्टीत यांनी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या स्मृती जतन व्हाव्यात आणि साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी कोथरुडमध्ये गदिमा स्मारक उभे राहणार आहे. एक-दीड महिन्यात स्मारकाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

सध्या गदिमा यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. याचे औचित्य साधून गदिमा स्मारकाच्या कामाला वेग येणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी गदिमा यांचे नातू सुमित्र माडगूळकर, नातसून प्राजक्ता माडगूळकर, कोथरुड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'स्मारकासाठी २०१७ मध्ये जागा ठरवण्यात आली. निविदा, मंजुरी अशी प्रक्रिया वर्षभर सुरू होती. फेब्रुवारीमध्ये प्रकल्पाला स्थायी समितीची मान्यता मिळाली. नऊ महिने कोरोनाचे संकट असल्यामुळे अनेक विकासकामे, प्रकल्प रखडले.  आता स्मारकाच्या कामाला वेग येणार असून त्यांच्या स्मृती जतन करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. एक ते दीड महिन्यात भूमिपूजन होईल. माडगूळकर कुटुंबाने सुचवल्याप्रमाणेच काम होणार आहे.

कसे असेल स्मारक:महापालिकेतर्फे बांधण्यात येणा-या ‘एक्झिबिशन सेंटर’ चार मजली असेल. हा प्रकल्प साहेसहा एकर जागेमध्ये उभा राहत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गदिमा स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे. या स्मारकाचे एकूण बांधकाम क्षेत्र ९३१ चौ.मी. आहे. इमारतीत प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र नाट्यगृह, गदिमा स्मारक, प्रदर्शन सेंटर, अँक्वारियम असे नियोजन करण्यात आले आहे. गदिमा स्मारकामध्ये त्यांचा जीवनप्रवास आणि साहित्याची समग्र माहिती देणारे दालन, गदिमांनी वापरलेल्या वस्तूंचे दालन, चित्रपटांचे दालन, डिजिटल दालन, आॅडिटोरियम आणि व्यवस्थापन कक्ष अशी पाच दालने निर्माण करण्यात येणार आहेत. संपूर्ण प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात साडेआठ कोटी रुपयांच्या आर्थिक तरतूदीला मान्यता मिळाली आहे.---------------गदिमा स्मारकासाठी ४३ वर्षे झगडत आहोत. मात्र, विलंब होत असल्याने संयम संपला होता. कोणत्याही व्यक्ती, पक्षाविषयी अढी नाही. गदिमा सर्वांचे होते आणि आहेत. महापौरांनी प्लॅनचे प्रेझेंटेशन दाखवलेत्यांच्या कार्यकाळात काम पूर्ण व्हावे. गदिमांचे स्मारक म्हणजे केवळ पुतळा उभा राहू नये. हे स्मारक डिजिटल असावे. त्यांचे साहित्य तेथे ऐकता, पाहता यावे. स्मारक बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याची व्यवस्थित देखभालही व्हावी. गदिमांच्या स्मृतीदिनी १४ डिसेंबर रोजी साहित्य जागर, वाचन होणार आहे.- सुमित्र माडगूळकर

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका