शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

GBS Virus: बारामतीत ‘जीबीएस’ने पुन्हा डोके वर काढले; शहरातील १५ वर्षीय युवकास लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 20:10 IST

युवकाची परिस्थिती बेताची असून त्याचे वडील अपंग शेतकरी आहेत, सध्या त्यांना युवकाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे

बारामती : पुणे शहरात भीतीदायक वातावरण निर्माण करणाऱ्या 'जीबीएस’ने काढता पाय घेतलेला असतानाचा बारामती शहरात मात्र या आजाराने डोके वर काढले आहे. शहरात कसबा परिसरातील एका १५ वर्षीय युवकास जीबीएस’ आजाराची लागण झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. या युवकावर पुणे शहरातील नवले रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

याबाबत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.महेश जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, संबंधित १५ वर्षीय युवक कसबा जामदार रोड येथे वास्तव्यास आहे. बुधवारी (दि २३) रात्री नेहमीप्रमाणे झोपी गेला. मात्र,गुरुवारी(दि २४) सकाळी त्याला उठता येत नव्हते. तसेच त्याला अशक्तपणा देखील जाणवत होता. त्यामुळे बारामती कसबा येथील खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या डाॅक्टरांनी या युवकाला पुढे शहरातील भाग्यजय हाॅस्पिटलमध्ये डाॅ.आर.डी.वाबळे यांच्याकडे पाठवले. या ठीकाणी मेंदु विकास तज्ञ डाॅ.सुयोग दोशी यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर डाॅ. दोशी यांनी त्याची तपासणी केल्यानंतर यांनी हा युवक संशयित 'जीबीएस’ रुग्ण असल्याची शक्यता व्यक्त करत त्याला उपचारासाठी पुण्याला पाठविण्याची शिफारस केली. त्यानंतर या युवकाला पुणे शहरातील काशीबाई नवले हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. शुक्रवारी(दि २५) या युवकाला या ठीकाणी दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तसेच त्याला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. याबाबत तालुका आरोग्य  अधिकारी डाॅ.मनोज खाेमणे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यानुसार सबंधित युवक वास्तव्यास असलेल्या परिसराचे तातडीने सर्व्हेक्षण हाती घेण्यात येत आहे. तेथील संशयित रुग्णांची उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करुन लक्षणे आढळल्यास उपचार करण्यात येतील. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाला गरज पडल्यास पुणे शहरात उपचारास पाठविण्याची शिफारस करण्यात येइल. दरम्यान,त्या युवकाचे ग्रामीण भागातील यात्राजत्रांमधून फिरणे झाले होते. त्याठीकाणी त्याने काही पदार्थ खाल्ले होते. अशी माहिती संबंधित युवकाच्या कुटुंबियांनी दिल्याचे डाॅ.जगताप यांनी सांगितले. आरोग्य विभाग याबाबत सखोल तपासणी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, या युवकाची परिस्थिती बेताची आहे. त्याचे वडील अपंग शेतकरी आहेत. सध्या त्यांना युवकाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

बारामती शहरात यापुर्वी एका ६५ वर्षीय रुग्णात जीबीएस आजाराची लक्षणे आढळली होती.मात्र, या रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आढळला होता. तसेच पुणे शहरात सिंहगड रोड परीसरात वास्तव्यास असणाऱ्या बारामतीकर युवतीला जीबीएस सदृश्य आजाराची लागण झाली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात या युवतीचा जीबीएस सदृश्य आजाराने मृत्यु झाला. तिला पुणे शहरातच या आजाराची लागण झाली होती. आता बारामतीत पुन्हा या आजाराने डोके वर काढल्याचे चित्र आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरMONEYपैसाFarmerशेतकरी