शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लष्करात अधिकारी असल्याचे खोटे पुरावे दिले; भरती करण्याचे सांगून तरुणांकडून ६० लाख लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 16:49 IST

बनावट आयकार्ड दाखवून तरुणीला व तिच्या आईची फसवणूक करुन केले लग्न, पत्नीच्या भावालाही घातला गंडा

ठळक मुद्देपोलिसांकडे आरोपीविरोधात अशा फसवणुकीच्या दहा तक्रारी आल्या आहेत.

पुणे: लष्करात अधिकारी असल्याचे बनावट आयकार्ड दाखवून तरुणीला व तिच्या आईला फसवून लग्न केले. पत्नीच्या भावाला लष्करात भरती करतो, असे सांगून २ लाख रुपयांना लुबाडले. तसेच त्यांच्या गावाकडील तरुणांना बनावट भरतीचे पत्र देऊन ५० ते ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी योगेश दत्तु गायकवाड (रा. किशोरे, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आळंदी येथील एका २१ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार बिबवेवाडीत जानेवारी २०२० मध्ये घडला होता.

महिलेच्या आईला रक्तदाब व मधुमेहाचा आजार असल्याने त्यांना बिबवेवाडी येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या होत्या. प्राथमिक उपचार करुन त्या हॉस्पिटलसमोर रिक्षाची वाट पहात होत्या. त्यावेळी योगेश गायकवाड तेथून जात असताना त्याच्या पँटच्या खिशातून आधार कार्ड पडले. ते महिलेने पाहिल्यावर ते देण्यासाठी त्यांनी आवाज दिला. गायकवाड याने त्यांच्याशी जवळीक साधून लष्करात अधिकारी असल्याचे सांगितले. लष्कराच्या गणवेशातील फोटो, बनावट आयकार्ड दाखवून महिला आणि यांच्या आईवडिलांचा विश्वास संपादन केला.

२१ वर्षीय महिलेशी खोटे बोलून लग्न केले. त्यानंतर त्याने महिलेला लष्करात मोठी भरती निघाल्याचे सांगितले. मुले भरण्यासाठी महिलेच्या वडिलांकडून त्यांच्या भावास भरती करण्यासाठी २ लाख रुपये घेतले. तसेच त्यांच्या गावातील व बाहेरील गावातील मुलांचा विश्वास संपादन करुन त्यांना लष्करामध्ये भरती करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून ५० ते ६० लाख रुपये घेतले. त्यांना लष्करात भरती झाल्याबाबत बनावट भरती पत्र देऊन त्यांची फसवणूक केली़.

आरोपीविरुद्ध अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा २०१९ मध्ये दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक आर. सी. उसगांवकर यांनी सांगितले की, आरोपीने फसवणूक केल्याचे फिर्यादीसह १० जणांच्या तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत. आरोपींने त्यांच्यापैकी काही जणांकडून १ ते ३ लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले आहेत. आरोपीने जवळपास ५० ते ६० लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकStudentविद्यार्थी