Pune: लोणावळ्याजवळ गावठी पिस्तूल, काडतुसासह एक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 17:10 IST2023-12-28T17:08:27+5:302023-12-28T17:10:05+5:30

लोणावळा (पुणे) : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वरसोली कचरा डेपोशेजारील गॅस गोडाऊनसमोर एका युवकाला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह ताब्यात ...

Gavathi pistol, one with cartridge seized near Lonavala pune crime news | Pune: लोणावळ्याजवळ गावठी पिस्तूल, काडतुसासह एक ताब्यात

Pune: लोणावळ्याजवळ गावठी पिस्तूल, काडतुसासह एक ताब्यात

लोणावळा (पुणे) :लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वरसोली कचरा डेपोशेजारील गॅस गोडाऊनसमोर एका युवकाला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. अविनाश ऊर्फ अवी कैलाश आंबेकर (वय २६, रा. देवले, ता. मावळ) असे त्याचे नाव आहे.

लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक अंकित गोयल, लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावत ही कारवाई करण्यात आली.

धुमाळ म्हणाले की, २६ डिसेंबर रोजी एक जण विनापरवाना गावठी पिस्तूल जवळून बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. तो वरसोली कचरा डेपो येथील भारत गॅसच्या गोडाऊनजवळ येणार होता. उपनिरीक्षक भारत भोसले व कर्मचारी गॅस गोडाऊनजवळ गेले असता तो त्यांना पाहून पळून जात असताना पथकाने त्याला पाठलाग करत पकडले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस असा ३५ हजार ५०० रुपयांचा माल मिळून आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gavathi pistol, one with cartridge seized near Lonavala pune crime news