पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 00:04 IST2020-10-22T23:58:08+5:302020-10-23T00:04:44+5:30

बुधवारी सायंकाळपासून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

Gautam Pashankar a well-known businessman in the automotive industry of pune has missing | पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

ठळक मुद्देपुत्र कपिल पाषाणकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली तक्रार

पुणे : वाहन उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम पाषाणकर हे बुधवारी (दि. २१) सायंकाळपासून बेपत्ता झाले आहेत. यासंदर्भात त्यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गौतम पाषाणकर हे बुधवारी दुपारी लोणी काळभोर येथील त्यांच्या गॅस एजन्सीच्या ठिकाणी कामानिमित्त गेले होते. तिथून ते जंगली महाराज रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात पोहचले. कारचालकाला पानशेत येथे एका कामासाठी जाण्यास सांगून ते गणेशखिंड रस्त्यावरील एलआसी कार्यालयापर्यंत गेले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याशी संपर्क न झाल्याने चालकाने कपिल पाषाणकर यांना याबाबत सांगितले. त्यानंतर शोधाशोध करून ते न सापडल्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

Web Title: Gautam Pashankar a well-known businessman in the automotive industry of pune has missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.