शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भरचौकात लघुशंका करणाऱ्या आहुजाला पुन्हा १ दिवसाची पोलीस कोठडी, तर भाग्येशला न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:13 IST

आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली होती

पुणे : लक्झरी कारने जात असताना, एका तरुणाने येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून लघुशंका केल्याचा व्हिडीओ शनिवारी (दि. ८) व्हायरल झाला. त्यानंतर शहरात संतप्त पडसाद उमटले. याची गंभीर दखल घेत येरवडा पोलिसांनी गौरव आहुजा याला रविवारी (दि. ९) सकाळी अटक केली.  याप्रकरणी गौरव मनोज आहुजा (२५, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) व त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (२५, रा. मार्केट यार्ड) यांच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ओसवाल याला शनिवारी रात्री अटक केली. दरम्यान गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

आज कोठडी संपल्यावर गौरव आहुजा याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला हजर करण्यात आल होत. गौरव आहुजा ने जे अश्लील कृत्य पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर येथे केलं होतं. त्या ठिकाणी आज येरवडा पोलिसांनी आहुजाला घेऊन जात पंचनामा केला. आहुजा याचा सोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला सुद्धा पोलिसांनी घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनेचा पंचनामा केला. 

कोर्टात असा झाला युक्तिवाद 

घटनेच्या वेळी जी BMW होती ती जप्त केली आहे. आरोपीचा मोबाईल अजून जप्त करायचा आहे. त्यामुळे आरोपींना २ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी. गाडी जप्त आहे. मात्र त्याला असलेल्या दोन्ही नंबर प्लेट काढून ठेवल्या आहेत. असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

पोलिस कोठडी मागणे जस्टीफाय होत नाही. अंगावर असलेले कपडे सुद्धा आम्ही पोलिसांना दिले आहे. मोबाईल जो होता तो पण दिला आहे. भाग्येश ओसवालच्या वकिलांनी सांगितले. 

ज्या कारणासाठी पोलिसांनी काल कोठडी मागितली ती कोर्टाने दिली. मात्र त्यानंतर पोलिसांकडे कुठलेच कारण नाही तरी ते पोलिस कोठडी मागत आहेत. विनाकारण ग्राउंड वर पोलिस कोठडी मागण्यात आली आहे असा युक्तिवाद आहुजाच्या वकिलांनी पुणे सत्र न्यायालयात केला. तसेच ओसवाल यांच्या वकिलांनी केला न्यायालयात जामीनासाठी आज अर्ज केला. 

आहुजाला पोलीस तर भाग्येशला न्यायालयीन कोठडी 

वकिलांच्या युक्तिवादानंतर पुणे सत्र न्यायालयाने गौरव आहुजा याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याCourtन्यायालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकadvocateवकिलSocialसामाजिकtraffic policeवाहतूक पोलीस