शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘असा’ ही सन्मान जेव्हा पदरी पडतो पिंपरी चिचवड महापालिका आयुक्तांच्या ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 15:28 IST

भाजपच्या पदाधिका-यांचे फक्त मलई खाण्यावर लक्ष असल्यामुळे कच-याची समस्या गंभीर झालेली आहे...

पिंपरी : महापालिकेची स्वच्छतेत पिछाडी झाल्याबद्दल महापालिका आयुक्तांना विरोधीपक्षाच्या वतीने कचऱ्यांचा बुके देण्यात आला. अभिनव पद्धतीने स्वच्छतेमध्ये झालेल्या पिछाडीचा निषेध करण्यात आला. पिंपरी-चिंचवड स्वच्छतेबाबत बेस्ट सिटी पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात मिळाला होता. मात्र, भाजपाची दोन वर्षांपूर्वी सत्ता आली अन जे शहर महाराष्ट्रात नंबर वन व देशात नवव्या क्रमांकावर होते. सन २०१७ मध्ये ७२ व्या स्थानी गेले तर सन २०१८ मध्ये शहर स्वच्छतेबाबत ४३ नंबरवर गेले. आता त्यानंतर यावर्षी ५२ व्या क्रमांकावर गेले. त्याबाबत आयुक्तांना कचऱ्यांचा गुच्छ भेट दिला. यावेळी विरोधी पक्षनपेते दत्ता साने, नगरसेवक राजू बनसोडे, विनया तापकीर, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, विनोद नढे उपस्थित होते. याबाबत विरोधीपक्षनेते दत्ता साने म्हणाले, स्वच्छता अभियानाच्या फक्त जाहिराती सुरु आहेत. परंतु, प्रत्यक्षात भाजपाचा आणि आपला कारभार नियोजन शुन्य आहे. भाजपच्या पदाधिका-यांचे फक्त मलई खाण्यावर लक्ष असल्यामुळे अद्याप कच-याची समस्या गंभीर झालेली आहे. भाजपच्या पदाधिका-यांनी कचरा सुध्दा सोडला नाही. त्यामुळे त्यांनी शहराचा कचरा करुन टाकला आहे. बेस्ट सिटीची भाजपाने कचरा सिटी करुन टाकली आहे. भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे शहरात सर्वत्र कच-यांचे ढीग साठले आहेत. कचरा विलनीकरणाचा बोजवारा उडाला आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या काळात तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या कार्यकालामध्ये पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेमध्ये राज्यात प्रथम क्रमांकवर होते तर देशात ९ व्या क्रमांकवर होते.

केंद्र सरकारच्या निदेर्शानुसार शहरातील एक रेल्वेस्टेशन,एक बसस्टॉप एक चौक व एक रस्ता व एक झोपडपट्टीची पाहणी करुन गुण दिले जातात.   शहरातील चिखली परीसर, चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी, विद्यानगर झोपडपट्टी, रामनगर गांधीनगर या परीसरात जाऊन तेथील सार्वजनिक शौचालय, मुता-या, रस्ता , कचरा इत्यादीबाबत पाहणी करणेबाबत सुचविले होते. या भागाची पाहणी जर सदस्यांनी केली असती तर आता जो ५२ वा नंबर आला आहे तो तर सोडाच पण पहिल्या १०० मध्ये आपल्या शहराचा समावेश झाला नसता.  कच-याची मोशी डेपोपर्यत वाहतूक करणे, डेपोत कचरा विलनीकरण करुन त्यावर प्रक्रीया करणे या बाबींतील त्रुटीमुळे शहर पिछाडीवर पडलेले आहे.  हे प्रशासनाचे आणि सत्ताधाºयांचे अपयश आहे. 

टॅग्स :Puneपुणेshravan hardikarश्रावण हर्डिकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस