पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दर्ग्यात गणपतीची आरती; सर्वधर्मसमभाव कार्यक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 09:42 PM2022-04-24T21:42:22+5:302022-04-24T21:43:06+5:30

सर्वधर्मसमभाव या अनुषंगाने भजन, कीर्तने, वासंतिक ओटी पूजा आणि रोजा इफ्तार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Ganpati Aarti at Dargah on behalf of Pune Police Commissioner | पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दर्ग्यात गणपतीची आरती; सर्वधर्मसमभाव कार्यक्रम 

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दर्ग्यात गणपतीची आरती; सर्वधर्मसमभाव कार्यक्रम 

googlenewsNext

पुणे: पुणे पोलीस आयुक्तालय, येरवडा पोलीस स्टेशन आणि शाहदावल बाबा दर्गा कमिटी यांच्या वतीने सर्वधर्मसमभाव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बाबांच्या गादी समोर गणपती आरती करण्यात आली. 

तसेच सर्वधर्मसमभाव या अनुषंगाने भजन, कीर्तने, वासंतिक ओटी पूजा आणि रोजा इफ्तार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य हिंदू - मुस्लिम बांधवांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. रोजा इफ्तार कार्यक्रमात बंधू भगिनी एकमेकांना घास भरवताना दिसून आले. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वांच्या उपस्थितीत हा आनंदी सोहळा पार पडला.

Web Title: Ganpati Aarti at Dargah on behalf of Pune Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.