Pune Crime: हडपसर परिसरात दहशत माजविणारा गुंड नागपूर कारागृहात स्थानबद्ध
By विवेक भुसे | Updated: December 30, 2023 15:57 IST2023-12-30T15:56:28+5:302023-12-30T15:57:12+5:30
अभिषेक ऊर्फ नयन हरिदास भोसले (वय १९, रा. शेवाळवाडी) असे या गुंडाचे नाव आहे....

Pune Crime: हडपसर परिसरात दहशत माजविणारा गुंड नागपूर कारागृहात स्थानबद्ध
पुणे : हडपसर परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडाला पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी एम पी डी ए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. अभिषेक ऊर्फ नयन हरिदास भोसले (वय १९, रा. शेवाळवाडी) असे या गुंडाचे नाव आहे.
अभिषेक भोसले हा आपल्या साथीदारांसह हडपसर परिसरात चाकू, कोयता यासारख्या घातक हत्यारांसह जबरी चोरी, चोरी, खंडणी, बेकायदा हत्यार बाळगणे से गंभीर गुन्हे करत असतो. गेल्या ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे कोणी उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, पी सी बीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी एम पी डी ए कायद्याद्वारे स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पाठविला.
पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन अभिषेक भोसले याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी एम पी डी ए कायद्यान्वये आतापर्यंत स्थानबद्धतेच्या ७६ कारवाया केल्या आहेत.