शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड निलेश घायवळला जामीन ; पोलिसांची डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 15:32 IST

विधानसभा निवडणुकीच्या काळातच निलेश घायवळ याची सुटका केल्याने आता पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे़..

ठळक मुद्देनिलेश घायवळ आणि गजानन मारणे या दोन टोळ्यांमधील वैमनस्यात शहरात अनेकदा गॅंगवॉर

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंडांवर शहर पोलीस वेगवेगळ्या कारवाया करीत असताना कुख्यात गुंड निलेश घायवळ याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे़. आज त्याला येरवडा तुरुंगातून सोडण्यात आले़ त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे़. निलेश घायवळ आणि गजानन मारणे या दोन टोळ्यांमधील वैमनस्यातून पुणे शहरात अनेकदा गॅंगवॉर झाले आहे़. त्यामुळे या दोन्ही टोळ्यांमधील बहुतांश गुंडांवर पोलिसांनी कारवाई करुन त्यांना तुरुंगात टाकलेले आहे़. निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत असून त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर २३ ते २४ गुन्हे दाखल आहे़. गजानन मारणे आणि घायवळ टोळीयुद्धांमध्ये २०१० मध्ये दत्तवाडी परिसरात ८ जून २०१० रोजी निलेश घायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करीत सचिन कुडले याचा खुन केला होता़. या खटल्यात फेब्रुवारी २०१९ मध्ये निलेश व त्याच्या साथीदारांची निर्दोष सुटका झाली होती़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल होता़. या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे़. येरवडा कारागृहातून आज सकाळी त्यांची सुटका झाली़. त्यानंतर त्याला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़. त्याला उच्च न्यायालयाने कोणत्या निकषावर जामीन मंजुर केला व त्यातील अटी काय आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे़. तसेच त्याच्यावर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांची सध्यस्थिती काय आहे, याची माहिती घेतली जात आहे़. त्यानंतर पुढील काय पावले उचलायची हे ठरविण्यात येणार आहे़. कोथरुड पोलीस सध्या निलेश घायवळ याची चौकशी करीत आहेत़.विधानसभा निवडणुकीच्या काळातच निलेश घायवळ याची सुटका केल्याने आता पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे़. कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, महसुल मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे निवडणुकीला उभे राहणार आहेत़. त्यात मतदार संघात बाहेरचा उमेदवार असा प्रचार त्यांच्याविरुद्ध होत आहे़. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघातील घडामोडीवर राहणार आहे़ .अशा काळात त्या भागात दहशत असलेला गुंड तुरुंगातून बाहेर आल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस