गुंड गजानन मारणेची पुन्हा कारागृहात रवानगी; पुणे न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:27 IST2025-03-03T16:26:17+5:302025-03-03T16:27:25+5:30

गजानन मारणे आणि टोळीवर पोलिसांकडून मकोका लावण्यात आला आहे.

Gangster Gajanan Marne sentenced to judicial custody by Pune court | गुंड गजानन मारणेची पुन्हा कारागृहात रवानगी; पुणे न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी

गुंड गजानन मारणेची पुन्हा कारागृहात रवानगी; पुणे न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी

Pune Crime: मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने अटकेत असलेला गुंड गजा मारणे याला पुणेन्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोथरूड परिसरात मारणे टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला बेदम मारहाण केली होती. भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय असलेल्या तरुणाला झालेल्या या मारहाणीनंतर पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले होते. गजानन मारणे आणि टोळीवर पोलिसांकडून मकोका लावण्यात आला. त्यानंतर गजा मारणेला आज ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मारणे याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

कोथरुड परिसरात १९ फेब्रुवारी रोजी देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याला टोळी प्रमुख म्हणून पोलिसांनी अटक केली होती. आज दुपारी २ वाजता गजानन मारणे आणि टोळीला न्यायालयात हजर केले गेले. फिर्यादी देवेंद्र जोग यांनी स्वतः कोर्टात हजर राहून कोणीही चिथावनी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
 
गजा मारणेला पोलिसांनी मोक्काच्या गुन्ह्यात सोमवारी रात्री उशिरा अटक केली होती आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची बडदास्त न ठेवता थेट मांडी घालून त्याला जमिनीवर बसवले होते. तसंच ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१), अमोल विनायक तापकीर (३५, तिघेही रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांना अटक केली होती. आरोपींपैकी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार हा गजा मारणे याचा भाचा असून, तो अद्याप फरार आहे. तर रुपेश मारणे आणि गजा मारणे या दोघांनादेखील पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी केले आहे. गजा आणि रूपेश याला याबाबत चाहूल लागताच दोघे फरार झाले होते. कोथरूड पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके दोघांचा शोध घेत होती. मात्र ते आढळून येत नव्हते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोघांना जेरबंद करण्यास पथकांना सांगितले होते. त्यासाठी पोलिसांनी गजासह त्याच्या साथीदारांच्या वास्तव्याच्या ७४ ठिकाणी झाडाझडती घेतली.

वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात २८ गुन्हे दाखल

गजा मारणे याच्यावर आतापर्यंत डेक्कन, कोथरूड, सासवड, दत्तवाडी, पौड, कामोठा, शिरगाव, हिंजवडी, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात २८ गुन्हे दाखल आहेत. पुढे एकेकाळचा मित्र असलेला नीलेश घायवळ याच्याशी गजा मारणेचे शत्रुत्व निर्माण झाले. बाबा बोडके याच्याशी देखील त्याचे शत्रुत्व निर्माण झाले. त्यातून या टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकले होते.

Web Title: Gangster Gajanan Marne sentenced to judicial custody by Pune court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.