शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वाहनांचे शाेरूम फाेडणारी टाेळी जेरबंद; महाराष्ट्रासह कर्नाटक, गाेवा राज्यातील २१ गुन्हे उघड

By प्रशांत बिडवे | Updated: August 22, 2023 17:10 IST

चोरलेल्या पैशातून गोव्यात मजामौज करताना पोलिसांनी ताब्यात घेतले

पुणे : चारचाकी वाहनांचे शाेरूम फाेडून राेख रक्कम चाेरी करणाऱ्या सराईतांच्या टाेळीस पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने जेरबंद केले. महाराष्ट्रासह कर्नाटकातील आठ आणि गाेवा राज्यात टाेळीने केलेले २१ शाेरूम फाेडत रक्कम चाेरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सावन दवल माेहिते (वय १९), साेनु नागुलाल माेहिते (वय २२), अभिषेक देवराम माेहिते (वय २०), जितु मंगलसिंग बेलदार( वय २३, चाैघे रा. बाेधवड, जि. जळगाव), बादल हिरालाल जाधव (वय १९, रा. मुक्ताईनगर, जळगाव) आणि पिंटु देवराम चाैहान ( वय १९ रा. इंदाैर मध्यप्रदेश) अशी अटक आराेपींची नावे आहेत.            बिबवेवाडी परिसरात दि. २८ जुलै राेजी देवकी माेटर्स शाेरूम फाेडून चाेरट्यांनी ४ लाख ९६ हजारांची रक्कम चाेरली हाेती. तत्पूर्वी भारती विद्यापीठ पाेलीस ठाणे हद्दीतही याप्रकारचे दाेन गुन्हे घडले हाेते गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने गुन्ह्यांची माहिती घेत तपासाला सुरूवात केली. पथकातील कर्मचाऱ्यांनी १९ किमी रस्त्यावरील सीसीटिव्ही चित्रफितींची पाहणी केली. तसेच एका संशयित गाडीच्या क्रमांकावरून मालकांची माहिती मिळविली. ताे मुळचा जळगाव येथील असल्याचे समजताच पथक जळगावला रवाना झाले.

पाेलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लाहाेटे, अंमलदार चेतन चव्हाण,राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, राहुल ढमढेरे, विलास खंदारे, दाउद सय्यद, अमित कांबळे, रमेश साबळे, दया शेगर, प्रताप गायकवाड, प्रमाेद टिळेकर, अश्रुबा माेराळे, अकबर शेख आदींच्या पथकाने कामगिरी केली.

अखेर मुंबईत पकडण्यात यश

जळगाव येथे आराेपींचा शाेध घेत असताना सर्व संशयित उत्तर भारतात फिरायला गेल्याचे समजले. विविध पथकांनी दिल्ली, मथुरा, हरिव्दार येथे जात आराेपींचा माग काढला. मात्र, तेथून आराेपी रेल्वेने मुंबईला निघाल्याचे समजले. त्यामुळे मुंबईतील बांद्रा येथे सापळा लावत अखेर सहा जणांना ताब्यात घेतले.

चाेरीच्या पैशांवर गाेव्यात माैजमजा

आराेपींनी दि. २१ जुलै राेजी पुण्यातील टाेयाटाे, ह्युदाई शाेरूममध्ये चाेरी केली. तेथून ते मुंबई-बंगळुरू महामार्गाने गाेव्याला निघाले. रस्त्यात कर्नाटकातील शिमाेगा जिल्ह्यांत शाेरूम फाेडून चाेरी केली. चाेरलेल्या पैश्यांवर गाेव्यात माैजमजा केली. परतत गाेव्यातील वेरना पाेलीस ठाणे हद्दीत आणखी दाेन शाेरूम फाेडले हाेते.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसbikeबाईकcarकारThiefचोरCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाgoaगोवा