शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:24 IST

Pune Gang War: गुन्हेगाराने सलग गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करून हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune Ganesh Kale Murder:  कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात आज झालेल्या गोळीबारात एक तरुण ठार झाला. गणेश काळे असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यावर गुन्हेगारांनी सलग ६  गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करून हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अधिक माहितीनुसार, गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ आहे. दत्ता काळे हा आयुष कोमकर हत्याप्रकरणातील आरोपी होता आणि त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही हत्या टोळीयुद्धाचा भाग असल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.  घटनास्थळी तात्काळ पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि कोंढवा पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वनराज आंदेकरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचा मास्टरमाइंड सोमनाथ गायकवाड व त्याचा साथीदार समीर काळे यांच्यावर आंदेकर टोळीचे बारकाईने लक्ष होते. आज समीर काळे यांचा भाऊ गणेश काळे हा खडी मशीन येथून येवलेवाडीकडे जात असताना भारत पेट्रोल पंपासमोर त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार इसमांनी गोळ्या झाडून त्याची रिक्षातच हत्या केली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1350654173134101/}}}}

या घटनेबाबत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे म्हणाले, गणेश काळे या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी खडी मशीन चौकात घडली आहे. याबाबत पोलिसांकडून सर्व CCTV तपासले जात आहेत. घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण झाला असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार आहे. मयत गणेश काळे हा रिक्षा चालक असून, तो येवलेवाडी परिसरात राहणारा आहे. त्यांनी पुढे घटनेची सविस्तर माहिती देतांना सांगितले, आरोपी दुचाकीवर आले होते. यातील एक दुचाकी जागेवरच सापडली आहे. गणेश काळे याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा देखील दाखल आहे. ही घटना टोळीयुद्धाशी संबंधित आहे का ? याचा तपास सुरू आहे. आरोपींना शोधण्यासाठी दहा पथके रवाना केली आहेत. असेही शिंदे यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Gang War Flares: Shooting in Kondhwa, One Dead

Web Summary : A young man, Ganesh Kale, was shot dead in Kondhwa, Pune. The attack, involving gunfire and sharp weapons, raises concerns about renewed gang warfare. Police are investigating possible links to previous gang-related incidents. Fear grips the area.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याFiringगोळीबारDeathमृत्यू