गणेशनगर-सोमनाथनगर लसीकरण केंद्र सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:19 AM2021-05-05T04:19:47+5:302021-05-05T04:19:47+5:30

त्वरित अधिकाऱ्यांना आदेश देऊन शिवराज विद्यामंदिर, सोमनाथ शिक्षण संस्था (सातव शाळा) किंवा सुंदरबाई मराठे विद्यालय यापैकी कुठल्याही शाळेत लसीकरण ...

Ganeshnagar-Somnathnagar Vaccination Center should be started | गणेशनगर-सोमनाथनगर लसीकरण केंद्र सुरू करावे

गणेशनगर-सोमनाथनगर लसीकरण केंद्र सुरू करावे

Next

त्वरित अधिकाऱ्यांना आदेश देऊन शिवराज विद्यामंदिर, सोमनाथ शिक्षण संस्था (सातव शाळा) किंवा सुंदरबाई मराठे विद्यालय यापैकी कुठल्याही शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेसचे सरचिटणीस संकेत गलांडे यांनी महापौर मुरली मोहळ व उपायुक्त रुबल अगरवाल यांच्याकडे निवेदन देऊन केली.

यानिमित्त सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आपल्या भागात लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल. तसेच विमाननगर येथील कोविड सेंटर सुरू करण्यात यावे किंवा त्याची जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आम्ही आमच्या संस्थेमार्फत तिथे कोविड सेंटर सुरू करू, अशी विनंती केली. महापौरांनीही त्याला प्रतिसाद देत सदर अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

महानगरपालिकेत असताना सहआयुक्त रुबल अग्रवाल यांची भेट झाली. त्यांनाही या विषयासंदर्भात माहिती दिली व त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनाही निवेदन देण्यात आले.

Web Title: Ganeshnagar-Somnathnagar Vaccination Center should be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.