शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील गणेशखिंड उद्यान होणार ‘बायोडायव्हर्सिटी हेरिटेज’:वनमंत्री संजय राठोड यांची माहिती   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 11:19 IST

राष्ट्रीय जैवविविधता मंडळाकडून मान्यता, मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा 

ठळक मुद्देगणेशखिंड उद्यानात शंभरी पार केलेले अनेक वृक्ष बागेत १६५ प्रकारची झाडे अन् औषधी वनस्पती 

पुणे : गणेशखिंड उद्यान पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे झोनल कृषी संशोधन केंद्र असून येथील ३३.०१ हेक्टर क्षेत्र जैवविविधता वारसास्थळ (बायोडायव्हर्सिटी हेरिटेज) म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. मुंबईत आज (दि.२१) झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. चेन्नई येथील राष्ट्रीय जैवविविधता मंडळाकडून वारसा स्थळे घोषित करण्याबाबत  राज्यांना मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी राज्यात ग्लोरी आॅफ आल्लापल्ली, गडचिरोली हे पहिले २०१४ मध्ये वारसा स्थळ घोषित झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर आता गणेशखिंड उद्यान व लांडोरखोरी, जळगाव हे नवीन  वारसा स्थळे म्हणून घोषित होतील. ब्रिटिशांच्या कारकीर्दीत गव्हर्नर जनरल सर जॉन माल्कम यांनी हे उद्यान विकसित केले. काही वर्षांनंतर जॉर्ज मार्शल वूड्रो यांनी १८७३ मध्ये या बोटॅनिकल गार्डनची जबाबदारी स्वीकारली. पुढे राहुरी कृषी विद्यापीठाने या उद्यानाला स्वत:च्या कार्यक्षेत्रात सामावून घेतले आणि त्या पेशवेकालीन आंब्याच्या बागेचे आणि जुन्या झाडांचे संवर्धन केले आहे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेले हे संशोधन केंद्र सध्या १४५ एकरमध्ये विस्तारले आहे.  

बागेत १६५ प्रकारची झाडे अन् औषधी वनस्पती गणेशखिंड फळ संशोधन केंद्राच्या पेशवेकालीन आंब्याच्या बागेतील आंब्याची जात हा इतरत्र न आढळणारा जनुकीय ठेवा आहे. पेशव्यांनी ही बाग तयार केलेली. याशिवाय, या बागेत १६५ प्रकारची जंगलात आढळणारी झाडे आहेत. यातील ४८ वनस्पती औषधी आहेत. दुर्मिळ प्रकारातील बुरशी, सूक्ष्म जीवांच्याही नोंदी आहेत.  

शंभरी पार केलेले अनेक वृक्ष गणेशखिंड उद्यानात पिकांच्या ४९ जाती ,फळांच्या २३ जाती उपलब्ध आहेत.या उद्यानात ३५ विविध क्षेत्र असून तेथे विविध वृक्ष व फळझाडे आहेत.या पैकी काही वृक्ष हे १०० वर्ष जुने आहेत. गणेशखिंड पुणे या केंद्राने विविध पिके व फळे यांच्या नवीन १९ जाती विकसित केल्या आहेत. 

========काही वर्षांपुर्वी गणेशखिंड उद्यानाचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला मान्यता दिल्याने ही गौरवास्पद बाब आहे. अनेक वर्षांपासून उद्यानाला हेरिटेज दर्जा मिळवा म्हणून प्रतीक्षा केली जात होती. ज्या ठिकाणी जैवविविधता आहे, तेथील स्थानिकांनी असे प्रस्ताव पाठविल्यास ते हेरिटेज होऊ शकतात. - विलास बर्डेकर, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणCentral Governmentकेंद्र सरकारforestजंगल