शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात जिवंत देखाव्यांची गणेशभक्तांना भुरळ; ऐतिहासिक आणि पौराणिक प्रसंगांचे पुनरुज्जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 21:09 IST

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका’, ‘छत्रपती संभाजी महाराज - इतिहासाचा तेजस्वी सूर्य’, ‘पावनखिंडीतील थरार’, ‘चापेकर बंधूंचा रँडवध’ असे ऐतिहासिक देखावे

पुणे: पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव जिवंत देखाव्यांनी सजला असून, पेठांमधील मंडळे यंदाही ऐतिहासिक आणि पौराणिक प्रसंगांचे भव्य सादरीकरण करून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका’, ‘छत्रपती संभाजी महाराज - इतिहासाचा तेजस्वी सूर्य’, ‘पावनखिंडीतील थरार’, ‘चाफेकर बंधूंचा रँडवध’ असे ऐतिहासिक देखावे तर ‘हनुमान-कुंभकर्ण युद्ध’ आणि ‘संत ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत व दिलेला उपदेश’ असे पौराणिक प्रसंग भाविकांसमोर जिवंत झाले आहेत. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शुक्रवार पेठेतील मंडळांची परंपरा यंदाही कायम असून, बहुतांश मंडळांनी जिवंत देखावे सादर करण्यावर भर दिला आहे. यामुळे वातावरणात अधिक उत्साह संचारला आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्या टप्प्यात दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन पार पडल्यानंतर गौरी गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी शनिवार, दिनांक २९ रोजी शहराच्या मध्यवर्ती भागातील मंडळांकडे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली., शनिपार मंडळाचा ‘पाण्याखालील द्वारका’ हा देखावा नागरिकांमध्ये प्रचंड आकर्षण ठरत आहे. ऐतिहासिक वारसा, पौराणिक प्रेरणा आणि सामाजिक संदेशांचा संगम असलेले हे देखावे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरत असून, भाविकांना नवचैतन्य देत आहेत.

नारायण पेठेतील मुंजोबा बाल तरुण मित्रमंडळाने साकारलेला ज्ञानेश्वर महाराज व चांगदेव महाराज भेटीचा ऐतिहासिक देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. कुंजीर तालीम उंबऱ्या गणपती मित्रमंडळाने शिवाजी महाराजांचे पन्हाळ्यावरून सुटका हा जिवंत देखावा सादर केला आहे. शनिवार पेठ येथील बालविकास मित्रमंडळ ट्रस्ट यांनी तेलंगणा येथील स्वर्णगिरी व्यंकटेश्वरा स्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे, ती पाहण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे. शनिवार पेठ येथील जय हिंद मित्रमंडळाने श्री आदिमाया आदिशक्ती साडेतीन शक्तिपीठांचा देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी विशेषत: महिला भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सवGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025SocialसामाजिकGanpati Festivalगणपती उत्सव २०२५