भाजपच्या पुणे जिल्ह्याध्यक्षपदी गणेश भेगडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 18:26 IST2019-07-29T18:22:45+5:302019-07-29T18:26:31+5:30
भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची निवड करण्यात आली. भेगडे यांनी यापूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी काम केले आहे. भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हलवणकर यांनी याबाबतची घोषणा केली.

भाजपच्या पुणे जिल्ह्याध्यक्षपदी गणेश भेगडे
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची निवड करण्यात आली. भेगडे यांनी यापूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी काम केले आहे. भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हलवणकर यांनी याबाबतची घोषणा केली.
पिंपरी-चिंचवड भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज आहेर मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. ते जिल्ह्यासाठी निवडण्यात आलेले मावळमधील पाचवे शहराध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीसाठी पुनर्वसन मंत्री बाळा भेगडे यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. गणेश हे त्यांचे अनेक वर्षांपासून विश्वासू सहकारी मानले जातात. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या निवडीचा फायदा भेगडे यांना होणार आहे. दरम्यान नवनिर्वाचित गणेश भेगडे हे अनेक वर्ष सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सह्याद्री इंग्लिश स्कुल आणि विश्वनाथ भेगडे पतसंस्थेचे संस्थापक आहेत. भेगडे तालीम मित्र मंडळाचे पदाधिकारी असून त्यांनी यापूर्वी भाजपच्या जिल्हा प्रभारीपदी काम केलेले आहेत. त्यांच्या निवडीसाठी मंत्री असलेल्या बाळा भेगडे यांनी ताकद पणाला लावण्याचे दिसून आले आहे.