तलाठी भाऊसाहेबांच्या खुर्चीला हार घालून घोडेगावात गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:14 IST2021-09-14T04:14:00+5:302021-09-14T04:14:00+5:30

घोडेगाव येथे कायस्वरूपी नवीन तलाठी नसल्याने नागरिकांची कामे होत नाहीत. लोक सारखे हेलपाटे मारतात. घोडेगाव तलाठी कार्यालयांतर्गत घोडेगावसह, ...

Gandhigiri in Ghodegaon wearing a garland on the chair of Talathi Bhausaheb | तलाठी भाऊसाहेबांच्या खुर्चीला हार घालून घोडेगावात गांधीगिरी

तलाठी भाऊसाहेबांच्या खुर्चीला हार घालून घोडेगावात गांधीगिरी

घोडेगाव येथे कायस्वरूपी नवीन तलाठी नसल्याने नागरिकांची कामे होत नाहीत. लोक सारखे हेलपाटे मारतात. घोडेगाव तलाठी कार्यालयांतर्गत घोडेगावसह, काळेवाडी-दरेकरवाडी, धोंडमाळ-शिंदेवाडी, गावरवाडी कोलदरा-गोनवडी, कोळवाडी-कोटमदारा ही गावे व यातील सुमारे तीन हजार खातेदार येतात.

घोडेगाव येथे कायस्वरूपी असणारे तलाठी संजय गायकवाड यांची पदन्नोती झाल्याने ते एक महिन्यापूर्वी जुन्नर येथे रुजू झाले. त्यानंतर घोडेगाव येथे तात्पुरत्या स्वरूपात तलाठी भाऊसाहेबांची नेमणूक करण्यात आली. परंतु ते ही न आल्याने सध्या घोडेगाव सजाला तलाठी नाही.

प्रशासनाचा निषेध म्हणून घोडेगाव व परिसरातील लोकांना तलाठी कार्यालयातील खुर्चीला हार घातला. यावेळी माजी पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे, सुदामशेठ काळे, सुनील इंदोरे, दिनेश हुले, नवनाथ काळे, गोविंद भास्कर, प्रकाश काळे आदी उपस्थित होते.

Web Title: Gandhigiri in Ghodegaon wearing a garland on the chair of Talathi Bhausaheb